अंडरवर्ल्डमधील कुख्यात डॉन बरोबर बॉलिवूडच्या या अभिनेत्री गात होत्या प्रेमाचे…..

मुंबई | अंडरवर्ल्ड आणि बॉलिवूड या दोघांचं एक वेगळचं नात आहे. बॉलिवूडमधील अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांची नावं मोठ मोठ्या गुन्हेगारांबरोबर जोडली गेली आहेत. ज्यामुळे या अभिनेत्रींचे करिअर बंद पडले. अनेकींना जेलची हवा देखील खावी लागली. तर आज या बातमीमधून बॉलिवूडच्या अशा काही अभिनेत्री पाहणार आहोत ज्यांनी अंडरवर्ल्ड माफियांचा प्रेमात अडकून स्वतः च जीवन उद्ध्वस्त करून घेतलं.
मोनिका बेदी
अभिनेत्री मोनिका बेदी ही सिनेसृष्टतील एक नामवंत अभिनेत्री होती. मात्र अंडरवर्ल्ड डॉन अबू सालेम बरोबर तिचं नाव जोडलं गेलं होतं. या दोघांची लव स्टोरी देखील खूप गाजली होती. मात्र काही दिवसांनी अभिनेत्रीला आपल्या प्रेमासाठी जेलची हवा खावी लागली.
अनिता अयुब
अभिनेत्री अनिता अयुबचं नाव दाऊद इब्राहिम बरोबर घेतलं जात होतं. या दोघांमध्ये खूप जवळीक होती. एकदा जावेद सिद्दीकी यांनी अनिताला त्यांच्या चित्रपटात घेण्यास नकार दिला होता. त्यामुळे दाऊदने त्यांचा खात्मा केला असे वृत्त त्यावेळी खूप चर्चेत होते.
मंदाकिनी
या यादीत बॉलिवूडची मादक आणि हॉट गर्ल मंदाकिनी देखील शमिल आहे. या अभिनेत्रीने देखील दाऊद बरोबर प्रेमाचे गीत गायले आहेत. एका स्टेडियममध्ये या दोघांना एकत्र पाहिलं गेलं होतं . मात्र अभिनेत्रीने अनेकदा या नात्याला माध्यमांसमोर खोटं ठरवलं आहे.
ममता कुलकर्णी –
ममता कुलकर्णी या अभिनेत्रीने खूप कमी कालावधीत बॉलिवूडवर आपली एक वेगळी ओळख निर्माण केली होती. मात्र विकी गोस्वामीच्या प्रेमात अडकून तिने फार मोठी चूक केली. तिने विकी बरोबर लग्न देखील केलं. मात्र नंतर एक अंमली पदार्थां प्रकरणी तिला अटक करण्यात आली.
सोना
सोना या अभिनेत्रीच नाव देखील अंडरवर्ल्डमधील एका डॉन बरोबर जोडलं गेलं आहे. डॉन हाजी मस्तानच्या प्रेमात ही अभिनेत्री बुडाली होती. तिने त्याच्याशी विवाह देखील केला. पण तो वयाने मोठा असल्याने लवकरच त्याचं निधन झालं. त्यानंतर सोनाच्या आयुष्यात एकटेपणा आला.