आई आलियाच्या नवीन लूकवर चाहते झाले फिदा…

आलिया भट्ट सध्या तिच्या कामात खूप व्यस्त आहे. तिला तिच्या बाळाच्या आगमनापूर्वी चित्रपटांची सर्व कामे पूर्ण करायची आहेत. त्यामुळे नुकतेच तिच्या एका चित्रपटाचे शूटिंग पूर्ण करून ती भारतात आली. आता ती तिच्या आगामी चित्रपटांचे प्रमोशन करत आहे. ती सध्या तिच्या डार्लिंग्स चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. ट्रेलर लॉन्चच्या वेळी आलियाने सनशाईन यलो ड्रेसने सर्वांचे लक्ष वेधले होते. अशात आता तिचा आणखीन एक वेगळा ड्रेस मधील फोटो व्हायरल होत आहे.
आलिया प्रेग्नेंट आहे त्यामुळे ती तिचा बेबी बंप लपवण्याचा नेहमी प्रयत्न करताना दिसते. तिच्या चित्रपटाच्या प्रमोशन वेळी तिने आणखीन एक असाच ड्रेस परिधान केला आहे ज्यामध्ये तिचा बेबी बंप अजिबात दिसत नाही. यावेळी आल्याने काळा रंगाचा एक ड्रेस निवडला आहे. या ड्रेसमध्ये ती अतिशय सुंदर दिसते.
काळया रंगाच्या ड्रेसवर गुलाबी आणि निळ्या रंगाचे फ्लोरल प्रिंट केलेले आहेत. त्याचबरोबर हा ड्रेस तिने खूप लूज ठेवला होता. आलियाने व्ही नेकलाइनसह पेप्लम डिझाईनचा कुर्ता निवडला. यावेळी लूक पूर्ण करण्यासाठी तिने मॅचिंग प्लाझो सेट घातला होता. तसेच यावर तिने मॅचिंग फुलांची ओढणी देखील घेतली होती. आलियाने या ड्रेस बरोबरच कानामध्ये ऑक्सीडाइज ज्वेलरी घातली होती.
कमीत कमी मेकअप आणि केस एका मध्यभागी पूर्णपणे उघडे ठेवले होते. ज्यामध्ये आलियाची क्यूट स्माईल तिला आणखी सुंदर बनवत होती. आलियाचा हा ड्रेस रिद्धी मेहरा यांच्या कलेक्शनमधून तिने घेतला असल्याचे देखील समजले आहे.