‘लग्नाच्या पहिल्याच रात्री तिने’ भाग्यश्री पटवर्धनच्या पतीने सांगितलं ते बेडरूम मधील ते गुपित

मुंबई | अभिनेत्री भाग्यश्री पटवर्धन या अभिनेत्रीला सर्वजण ओळखतात. एकाच चित्रपटातून तिने एवढी हवा केली की ती आजही अनेकांच्या लक्षात आहे. सध्या अभिनेत्रीची जोरदार चर्चा सुरू आहे. तिचा पती हिमालय दसानी यांनी या दोघांच्या पहिल्या रात्री बद्दल खुलासा केला आहे. त्यामुळेच भाग्यश्री विशेष चर्चेत आली आहे.
मैने प्यार किया या चित्रपटांमधून भाग्यश्री नावा रूपाला आली. या चित्रपटानंतर तिने ज्या काही चित्रपटांमध्ये काम केले त्या चित्रपटांमध्ये तिच्याबरोबर हिमालय होता. सेटवर चित्रपटांमध्ये काम करत असताना हे दोघे एकमेकांच्या जवळ आले. नंतर मैत्री वाढून ती प्रेमात बदलली आणि लेगचच दोघांनी लग्न केले. आता तब्बल तीस वर्षानंतर हे दोघे पुन्हा एकदा एकत्र स्क्रीन शेअर करत आहेत. स्टार प्लस वरील स्टार जोडी या कार्यक्रमांमध्ये या दोघांनी सहभाग घेतला आहे.
भाग्यश्रीने जो काही अभिनय केला तो हिमालय बरोबर केला होता. लग्न झाल्यानंतर या दोघांनी अभिनयामधून काढता पाय घेतला. त्यानंतर आता एवढ्या मोठ्या ब्रेक नंतर दोघे पुन्हा एकदा रुपेरी पडल्यावर परतले आहेत. या दोघांनी पळून जाऊन लग्न केलं अशी त्याकाळी चर्चा होती. भाग्यश्री ही अभिनेत्री दिसायला एवढी सुंदर आहे की अनेक जण त्याकाळी तिच्या प्रेमात पडले होते. तिच्या पहिल्या चित्रपटांमधून ती खूप हिट झाली होती. या चित्रपटाचे सर्वांना एवढे वेड लागले होते की, चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर बाजारामध्ये भाग्यश्रीने चित्रपटात जे काही परिधान केले होते त्या सर्व गोष्टी विकण्यासाठी आल्या होत्या. त्याकाळी भाग्यश्री कडे असलेले ड्रेस देखील अनेक मुलींनी खरेदी केले होते.
आशात आता दोघांच्या लग्नानंतर पहिल्या रात्रीचा किस्सा तिच्या पतीने सर्वांसमोर जाहीर केला आहे. यशो मध्ये बोलत असताना हिमालयने सांगितले की, “आमच्या लग्नाच्या पहिल्याच रात्री मी खूप चकित झालो होतो. कारण लग्न झाल्यानंतर मला असं वाटलं होतं की त्या रात्री भाग्यश्री डोक्यावर पदर घेऊन बसलेली असेल. जेव्हा मी रात्री आमच्या रूममध्ये गेलो तेव्हा भाग्यश्री मला नाईट गाऊनमध्ये दिसली. त्यामुळे मी विशेष चकित झालो.” यावर भाग्यश्रीने सांगत असताना सुरुवातीला तिच्या लग्नातील चर्चेबद्दल सांगितले.
यावेळी भाग्यश्री म्हणाली की, ” पहिले तर हे सांगते की आम्ही पळून जाऊन लग्न केलं नव्हतं. कुटुंबीयांच्या उपस्थितीमध्ये आमचा विवाह पार पडला. हिमालय आणि माझं नातं हे खूप वेगळ आहे. आमच्या आयुष्यामध्ये आम्ही काही कठीण काळाचा देखील सामना केला आहे. लग्नानंतर काही काळानंतर आमच्यामध्ये भरपूर भांडण झाली होती. त्यामुळे एकूण एक वर्ष आम्ही दोघे एकमेकांशी बोलत नव्हतो. मात्र आमच्यातलं प्रेम आम्हाला पुन्हा एकदा एकमेकां जवळ घेऊन आलं. हिमालय म्हणजेच माझं पहिलं प्रेम. माझ्या पहिल्याच प्रेमाला मी पूर्ण न्याय दिला. मी त्याच्याच बरोबर लग्न केलं आणि मी अजूनही त्याच्याबरोबर सुखी आयुष्य जगत आहे.”
भाग्यश्री आणि हिमालय हे दोघे देखील स्मार्ट जोडी यशोमध्ये सहभागी झाले आहेत. याच शोमध्ये त्यांनी या सर्व गोष्टी चाहत्यांना सांगितले आहेत. त्यामुळे दोघांच्या जोडीचे आणि प्रेमाचे विशेष कौतुक होत आहे. यावेळी भाग्यश्रीने ती बॉलीवूडमध्ये पुन्हा एकदा येणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे अनेक चाहते आता ती कोणत्या चित्रपटांमधून कमबॅक करणार याची वाट पाहत आहेत.