मनोरंजन

सीमेवरील खऱ्या जवानाने गायलं ‘बॉर्डर’ या चित्रपटातील “ये जाते हुए लम्हो…” हे गाणं! जवानाचं गाणं ऐकून तुमचे ही डोळे पाणवतील….!

आपल्या देशाच्या सेवेसाठी प्रत्येकच नागरिक काही ना काही करत असतो. मात्र या सर्वांमध्ये भारतीय जवानांचे काम लाख मोलाचे आहे. आपला जीव मुठीत घेऊन सीमेवरती हे जवान कायमच तैनात असतात. कुटुंब, घर, परिवार या सर्वांचा विचार बाजूला ठेवत हे जवान मोठ्या जिकरीने शत्रूला धारातीर्थी पाडतात.

चित्रपटांमध्ये दाखवण्यात येणाऱ्या हीरो पेक्षाही या जवानांची प्रसिद्ध ही मोठी आहे. कोणताही स्वार्थ न बाळगता हे जवान अहोरात्र देशाची सेवा करतात. याच जवानांची कहाणी सांगणारा आणि त्यांचे आयुष्य अगदी जवळून दाखवणारा एक चित्रपट काही वर्षांपूर्वी प्रदर्शित झाला होता. बॉर्डर या चित्रपटामध्ये जवानांची सर्व गाथा मांडली गेली होती. हा चित्रपट पाहून मनाला एक वेगळच समाधान मिळतं. चित्रपट पाहताना हास्य, दुःखद, राग, आनंद अशा सर्वच भावना जाग्या होतात.

बॉर्डर हा चित्रपट जेव्हा प्रदर्शित झाला तेव्हा तिकीट बारीवर या चित्रपटाने बक्कळ कमाई केली. या चित्रपटातील सर्व गाणी देखील खूप हिट ठरली होती. अशात याच चित्रपटातील “ये जाते हुए लम्हो” हे गाणं खूप गाजलं होतं. आजही हे गाणं काणी पडल्यावरती डोळ्यांत अश्रू दाटून येतात. चित्रपटातील जवानांची भूमिका साकारणाऱ्या कलाकारांनी हे गाणं गायलेलं आपण पाहिलंच आहे. मात्र आता हे गाणं सीमेवर तैनात असलेल्या एका खऱ्या जवानाने गायल आहे.

विक्रमजीत सिंग असे या जवानाचे नाव असून त्यांनी हे गाणं अगदी लयबद्ध पद्धतीने गायल आहे. सोशल मीडियावर विक्रमजीती यांच्या गाण्याचा हा व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे. सुरांची असलेली जान आणि विशेष म्हणजे या गाण्याचे बोल ऐकून अनेक जण भाऊक झाले आहेत. काहीच वेळामध्ये हा व्हिडिओ तुफान व्हायरल झाला असून याला भरपूर लाईक मिळाले आहेत. विक्रमजीत सिंग हे आयटीबीपीचे जवान म्हणून कार्यरत आहेत. याआधी देखील एक गाणं गायलं होतं. “तुमसे ही” असे त्या गाण्याचे बोल होते. 2017 मध्ये रायझिंग स्टार या कार्यक्रमामध्ये विक्रमजीत शामील झाले होते. यावेळी त्या शोमध्ये त्यांनी हे गाणं गायलं होतं. तेव्हा देखील त्यांच्या सुरांना अनेकांनी दात दिली होती. तसेच त्यांचे हे गाणं देखील खूप वायरल झालं होतं. शोमध्ये मात्र त्यांना विजय मिळू शकला नाही. परंतु या शोमुळे त्यांची प्रसिद्धी अधिक वाढली. या शो मध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झालेले असताना ते कायमच सैन्य दलातील युनिफॉर्ममध्ये येत होते.

काही मुलाखतींमध्ये त्यांना त्यांच्या युनिफॉर्म बद्दल विचारण्यात आले. त्यावेळी त्यांनी सांगितले होते की, ” माझं गाणं आणि माझा युनिफॉर्म हीच माझी खरी ओळख आहे.” या एका रियालिटी शोमुळे विक्रमजीत खूप प्रसिद्धझोतात आले. बॉर्डर या चित्रपटातील त्यांचं व्हायरल होत असलेलं गाणं पाहून अनेक व्यक्ती त्यांना इंडियन आयडलमध्ये जाण्याची शिफारस करत आहेत.
“ये जाते हुए लम्हे” हे गाणं बॉर्डर या चित्रपटामध्ये रूप सिंग राठोड या संगीतकाराने गायलं असून या गाण्याचे बोल जावेद अख्तर
ने लिहिले आहेत.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close