फोटोत दिसत असलेल्या या तीन बहिणी सध्या गाजवत आहेत सिने सृष्टी, एकीने सलमान खान बरोबर बॉलीवूडमध्ये केले पदार्पण, ओळखा पाहू या आहेत तरी कोण…?

दिल्ली | बॉलीवूडच्या दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांच्याबरोबर असलेल्या या तीन मुलींना ओळखण्याची स्पर्धा सुरू आहे. सोशल मीडिया वरती सध्या श्रीदेवी यांच्याबरोबर असलेल्या या तीन मुलींचा हा फोटो तुफान वायरल होत आहे. या तिघी देखील अभिनय क्षेत्रात प्रचंड सक्रिय होत्या. एक काळ होता जेव्हा या तिघींनी देखील बॉलीवूड वर मोठे राज्य केले. बॉलीवूडच नाही तर या तिघींनी दाक्षिणात्य सिनेसृष्टी देखील गाजवली. या तिघी एकमेकींच्या सख्ख्या बहिणी आहेत.
फोटोमध्ये दिसत असलेली सर्वात मोठी मुलगी हिने सलमान खानच्या एका चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पहिले पाऊल ठेवले होते. नंतर तिने बॉलीवूड मधील अनेक मोठमोठ्या कलाकारांबरोबर स्क्रीन शेअर केली. ज्यामध्ये अक्षय कुमारचे नाव देखील आहे. या अभिनेत्रीने आपल्या अभिनयाच्या जोरावर मोठी पसंती मिळवली. बॉलीवूड प्रमाणे तिने टॉलीवूड आणि भोजपुरी सिनेसृष्टी देखील गाजवली.
फोटोमध्ये मध्यभागी बसलेली ही छोटी मुलगी साउथ इंडस्ट्री मधली मोठी अभिनेत्री आहे. तिने बॉलीवूड मध्ये देखील काम केले आहे. अक्षय खन्ना अभिनीत डोली सजा के रखना या चित्रपटामध्ये ती पहिल्यांदा काम करताना दिसली. पहिल्याच चित्रपटातून तिने खूप प्रसिद्धी मिळवली.
फोटोत दिसत असलेल्या या दोन बहिणी प्रमाणेच छोटी बहिण देखील नावाजलेली अभिनेत्री आहे. साउथ सिनेसृष्टीमध्ये तिने अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. फोटो दिसत असलेल्या या तीनही मुली एकमेकींच्या बहिणी आहेत.
आतापर्यंत तुम्हाला या तीन बहिणींची ओळख पटली नसेल तर आम्ही तुम्हाला सांगतो की या तिन्ही बहिणींची नावे नगमा, ज्योतीका आणि रोशनी अशी आहेत. नगमा या अभिनेत्रीने बॉलीवूड बरोबरच विविध भाषांमध्ये चित्रपट केले आहेत. तिच्या प्रत्येक चित्रपटाला प्रेक्षकांनी उत्तम प्रतिसाद दिला आहे. तिची प्रसिद्धी पाहता काँग्रेसकडून तिला तिकीट देखील मिळालं होतं. साल 2014 मध्ये ती मेरठ या ठिकाणी निवडणूक लढली होती. तिची प्रसिद्धी पाहता तिला हे तिकीट मिळालं होतं.
ज्योतीका आणि रोशनी या दोघी नगमाच्या सावत्र बहिणी आहेत. अभिनेत्रीच्या आईचे दुसरे लग्न झाले होते त्यामुळे तिच्या या दोन सावत्र बहिणी आहेत. साल १९९० मध्ये आलेला चित्रपट बागी यामधून तिने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. या चित्रपटातील तिचा अभिनय इतका दमदार होता की या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर मोठी कमाई केली.
या चित्रपटाच्या प्रसिद्धीनंतर तिच्यासमोर अनेक मोठ्या हिट चित्रपटांची रांग लागली. हिंदीच नाही तर तमिळ, तेलुगु, कन्नड अशा विविध भाषेत चित्रपटांमध्ये अभिनय करण्याची तिला संधी मिळाली. या सर्व चित्रपटांमध्ये तिने दमदार अभिनय केला तसेच मिळालेल्या प्रत्येक संधीचे तिने सोने करण्याचा प्रयत्न केला. तिच्या कारकिर्दी मधील अब तुम्हारे हवाले वतन साथियो, लाल बादशहा, एल्गार , सुहाग, कुवारा हे सर्वाधिक गाजलेले चित्रपट आहेत.