आईच्या कुशीत बसलेली ही चिमुकली आहे बॉलीवूडची दिग्गज अदाकारा

बॉलिवूडमध्ये असे अनेक स्टार्स आहेत जे आपल्या अभिनयामुळे प्रेक्षकांमध्ये खूप लोकप्रिय आहेत. फिल्म इंडस्ट्रीतील हे स्टार्स सोशल मीडियावर अनेकदा कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. आता बॉलिवूडची एक दिग्गज अभिनेत्री इंटरनेटवर चर्चेत आहे. खरंतर, एका बॉलिवूड अभिनेत्रीचा बालपणीचा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. अभिनेत्रीचे हा फोटो पाहून तिला ओळखणे जवळपास अशक्य आहे. मात्र अनेकजण हे चॅलेंज स्वीकारत आहेत.
तुम्ही देखील अजून या चिमुकलीला ओळखू शकले नसाल तर आम्ही तुम्हाला सांगतो की, ही अभिनेत्री रेखा आहे. रेखा आजही अनेक रियालिटी शोमध्ये दिसतात. डान्स इंडिया डान्समध्ये त्या परीक्षक म्हणून दिसल्या होत्या. यावेळी त्या नेहमी जरीच्या साडीत येत होत्या. त्यांचा तो साज पाहून अनेक जण या वयात देखील त्यांच्या प्रेमात पडत होते.
रेखा इंडस्ट्रीतील एक प्रसिद्ध अभिनेत्री असण्यासोबतच त्या राज्यसभेच्या खासदारही राहिल्या आहेत. आपल्या चित्रपट आणि अभिनयामुळे चर्चेत असलेल्या रेखा त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत राहतात. रेखा यांचे नाव बॉलीवूडच्या बिग बीं बरोबर नेहमीच जोडले जाते.
रेखा आणि अमिताभ यांची प्रेम कहाणी त्यांच्या काळात खूप गाजली होती. मात्र अमिताभ विवाहित असल्याने त्यांनी रेखा यांच्याशी कधीच लग्न केले नाही. त्यामुळे रेखा यांनी १९९० मध्ये मुकेश अग्रवाल यांच्या बरोबर लग्न केले. मात्र त्याच वर्षी त्यांच्या पतीचे निधन झाले. तेव्हा पासून त्या अविवाहित आहेत. मात्र अजूनही त्या हातात हिरव्या बांगड्या घालतात आणि कपाळावर कुंकू देखील लावतात.
अनेक व्यक्ती असे म्हणतात की, त्या आजही अमिताभ बच्चन यांच्या नावाचे कुंकू लावतात. रेखा यांनी अभिनेते पुष्पवल्ली आणि जेमिनी गणेशन यांची मुलगी, रेखाने बाल अभिनेत्री म्हणून इंटी गुट्टू आणि रंगुला रत्नम या तेलगू चित्रपटांतून त्यांच्या कारकिर्दीला सुरुवात केली . कन्नड चित्रपट ‘ ऑपरेशन जॅकपॉट नल्ली सीआयडी ९९९ हा चित्रपटात त्यांची प्रमुख भूमिका असलेला पहिला चित्रपट होता. सावन भादोन या चित्रपटातून त्यांनी हिंदी चित्रपटात पदार्पण केले. साल 1978 मध्ये घर आणि मुकद्दर का सिकंदर मधील त्यांच्या अभिनयाने त्यांना खरी ओळख मिळाली.