मनोरंजन

सर्वाधिक कमाई करणारे मराठी सिनेसृष्टीतील १० चित्रपट कोणते आहेत जाणून घ्या

मुंबई  | चित्रपट म्हटलं की, त्यातील अभिनय, चित्रिकरण यापासून ते चित्रपटाच्या तिकीट बरीवरील कमाई पर्यंत सर्वच जन यावर चर्चा करताना दिसतात. मग यामध्ये बॉलिवूडच्या बिग बजेट चित्रपटांची तर मोठी चर्चा होताना दिसते. मात्र मराठी चित्रपट कमी बजेटचे असले तरी देखील ते सुद्धा बॉक्स ऑफिसवर भरघोस कमाई करत असतात. या बातमीतून असेच काही १० हिट आणि घसघशीत कमाई करणारे चित्रपट पाहणार आहोत.

 

मुळशी पॅटर्न

मुळशी या तालुक्यावर आधारित या चित्रपटाची कथा आहे. यामध्ये जमिनी विकून स्वतःच्याच गावात मजुरी करणाऱ्या शेतकऱ्यांची कहाणी दाखवण्यात आली आहे. सुपर ड्रामा, ॲक्शन आणि रोमान्सने भरलेला हा चित्रपट गुन्हेगारी विश्र्वाच खरं मूळ दाखवतो. यामध्ये प्रवीण तरडेसह ओम भुतकर, उपेंद्र लिमये आदीं कलाकार आहेत. या चित्रपटाचं बॉक्स ऑफिसवर २० ते २२ कोटिंच कलेक्शन झालं आहे. तर ११ दिवसांमध्येच सिनेमाने ११ कोटींची कमाई केली होती.

 

नाळ

फॅन्ड्री आणि सैराटच्या अभूतपूर्व यशानंतर नाळ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. यामध्ये एका लहान मुलाची कथा दाखवली गेली आहे. संपूर्ण चित्रपट हा या छोट्या मुलाभोवती फिरतो आहे. त्याचे आई बाबा त्याच्यावर खूप प्रेम करतात पण एक दिवस त्याला समजते की, हे आपले खरे आई बाबा नाहीत तेव्हा त्याच्या जीवाची होत असलेली घालमेल चित्रपटात दिसते. या चित्रपटाचं दिग्दर्शन सुधाकर रेड्डी यांनी केलं आहे. तसेच श्रीनिवास पोकळे, नागराज मंजुळे आणि देविका दफ्तर हे तीन कलाकार चित्रपटात मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटाचं एकूण कलेक्शन हे २४.७२ कोटींच झालं होतं.

 

मी शिवाजीराजे भोसले बोलतोय

छत्रपती शिवाजी महाराज यांनी बांधलेलं सरज्य आणि त्यांची शिकवण काय आहे हे या चित्रपटातून पाहायला मिळते. महाराष्ट्रातच मराठी माणसाला असलेली किंमत आणि त्यासाठी त्याची होत असलेली फरपट इथे प्रकर्षाने दाखवली आहे. मात्र मराठी माणूस जेव्हा पेटून उठतो तेव्हा सर्व काही लख्ख करू शकतो ही मराठी माणसाची ताकत चित्रपटात दिसते. या चित्रपटाची पहिल्याच आठवड्यातील कमाई ही १.५ कोटींच्या घरात पोहोचली होती. तर एकूण २५ कोटींचा गल्ला हा चित्रपट कमवू शकला होता.

 

दुनियादारी

प्रेम आणि मैत्रीची खरी परिभाषा सांगणारा हा चित्रपट. सुहास शिरवळकरांच्या कादंबरीतून या चित्रपटाची कथा घेण्यात आली आहे. संजय जाधव दिग्दर्शित या चित्रपटात स्वप्निल जोशी, सई ताम्हणकर, अंकुश चौधरी, उर्मिला कानेटकर, जितेंद्र जोशी अशा हरहुन्नरी कलाकारांची झलक यामध्ये एकत्र पाहायला मिळाली. या चित्रपटाची एक आठवड्याची कमाई १.८ कोटी होती. तर दिलं दोस्ती दुनियादारी या सर्वांचा एकच मेळ म्हणजे दुनियादारीने शेवटपर्यंत ३२ कोटींचा नफा कमवला.

 

टाईमपास

प्रत्येकाला आपल्या आयुष्यात लहानपणी एकदा तरी पहिलं आणि खरं प्रेम होत असतं हे या चित्रपटातून दिसलं. प्रेमात रंग, जात आणि वर्ण या सीमा नसतात हे देखील येथे दाखवण्यात आलं. या चित्रपटात प्रथमेश परब आणि केतकी माटेगावकर मुख्य भूमिकेत होते. या चित्रपटाने अवघ्या दोन दिवसांत ५ कोटींवर शिक्कमोर्तब केला. आणि नंतर हा चित्रपट ३३ कोटींच्या घरात पोहचला.

 

कट्यार काळजात घुसली

संगीत आणि सुरांचा अनोखा मेळ मग तिथे पुन्हा एकदा छळ कपट आणि सुरांशी खेळ या चित्रपटाने दाखवला. चित्रपटात सचिन पिळगावकर, शंकर महादेवन, अमृता खानविलकर, पुष्कर श्रोत्री, मृण्मयी देशपांडे हे कलाकार प्रमुख भूमिका साकारत होते. पहिल्याच आठवड्यात हा चित्रपट ४ कोटींच्या घरात पोहचला आणि नंतर ४० कोटींवर जाऊन थांबला.

 

लय भारी

“….. च्यामायला आपलं सगळच लय भारी” असं सांगणारा हा चित्रपट एका आईच्या मुलाच्या नात्याला दर्शवतो. चित्रपटात एक आई ती आई व्हावी म्हणून विठ्ठलाला आपलं पहिलं मूल दान करण्यास तयार होते असं दाखवल आहे. हा चित्रपट १०० हून अधिक दिवस थिएटरमध्ये चालला. यामध्ये रितेश देशमुख, राधिका आपटे, आदिती पोहनकर, शरद केळकर या कलाकारांनी चित्रपटात दमदार अभिनय केला होता. साल २०१४ मध्ये आलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिस ४० कोटींची कमाई केली. तर पहिल्याच दिवशी ३.१ कोटींची कमाई हा चित्रपट करू शकला.

 

 

पावन खिंड

शूर वीर बाजीप्रभू देशपांडे यांच्या आयुष्यावर आधारित हा चित्रपट प्रत्येक मराठी माणसाने आवर्जून पाहिला. अजय पुरकर हे यामध्ये मुख्य भूमिका साकारताना दिसले. दिगपाल लांजेकर यांनी चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं. या चित्रपटाची एकूण कमाई ४६.६ कोटींची झाली होती. तर पहिल्याच आठवड्यात १२.१७ चा गल्ला झाला होता.

 

नटसम्राट

दिग्गज अभिनेते नाना पाटेकर यांच्या दमदार अभिनयाला कशाचीच तोड नाही. या चित्रपटात कुटुंब प्रमुख असलेले वडील आपल्या मुलांवर माया करणारी आई या आई बाबांना मुलं मोठी झाली की किती वाईट वागणूक देतात हे सांगण्यात आले आहे. चित्रपटात नाना पाटेकर यांच्यासह मेधा मांजरेकर, विक्रम गोखले, मृण्मयी देशपांडे या कलाकारांच्या मुख्य भूमिका आहेत. “कुणी घर देता का घर….” या एका डायलॉगवर या चित्रपटाने एकाच आठवड्यात १० कोटींची कमाई केली होती. आणि बॉक्स ऑफिसवर ४८ कोटींची कमाई या चित्रपटाने केली.

 

सैराट

आजही झिंगाट गाणं वाजलं तरी अनेक जण सैराट होतील एवढी ताकत या चित्रपटात आहे. आधी सरळ कहाणी नवोदित कलाकार तरी देखील डायरेक्शनवर झाली सर्व खेळी. मी जो कलाकार निवड तो तोच पुढे जाऊन स्टार होतो असं ठामपणे सांगणारा मराठी नव्हे तर सर्वच सिनेसृष्टीतील एकमेव दिग्दर्शक म्हणजे नागराज मंजुळे. या चित्रपटाची हवा आजही कायम आहे. त्याकाळी या चित्रपटाने १०० कोटींचा टप्पा पार करून मराठी सिनेसृष्टीच रुपडच पालटलं होतं.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close