सोलापूर पुन्हा हादरल! १४ वर्षांच्या मुली नंतर आत्ता ९ वर्षांच्या चिमुकलीला हृदयविकराचा झटका; कारण जाणून धक्काच बसेल

सोलापूर | अनेक लहान मुलं खेळताना पडतात त्यांना लागतं, मात्र असे करतच ही लहान मुलं मोठी होतात, आणि स्ट्रॉंग बनतात. आतापर्यंत तुम्ही अनेक वयोवृद्ध व्यक्तींना हार्ट अटॅक येऊन त्यांचे निधन झाल्याचे ऐकले असेल. काही तरुण मुला-मुलींमध्ये देखील हे प्रमाण सध्याच्या घडीला वाढत आहे. मात्र सोलापूरमध्ये डोकं चक्रावणारा एक प्रकार घडला आहे. फक्त नऊ वर्षांच्या एका चिमुकलीला हार्ट अटॅक आला आहे.
या छोट्याशा मुलीचे हृदय अगदी 65 वर्षाच्या वृद्ध व्यक्ती एवढे कमकुवत झाले आहे. सोलापुरात राहणारी 9 वर्षांची अवनी ही तिच्या मित्र-मैत्रिणींबरोबर खेळत होती. यावेळी खेळत असताना अचानक तिच्या छातीमध्ये दुखू लागले. तिला छातीत जोरात कळ येऊ लागली. त्यामुळे तिच्या आई-बाबांनी तिला तातडीने रुग्णालयात नेले. एवढ्या लहान वयातच या मुलीला हृदयविकाराचा झटका आल्याने डॉक्टर देखील चकित झाले आहेत.
एका वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, या चिमुकलीच्या छातीत दुखू लागल्याने ती जमिनीवर कोसळली. यावेळी तिच्या आई-वडिलांनी तातडीने तिला नजीकच्या रुग्णालयात दाखल केले. इथे तिच्यावर अगदी वृद्ध व्यक्तींवर होते तशी बायपास सर्जरी देखील करण्यात आली. एवढ्या कोवळ्या वयात या मुलीला बायपास सर्जरी करावी लागली आहे.
या संपूर्ण घटनेबाबत अनवीचे वडील यांनी सांगितले की, ती रोज जशी खेळते त्याच पद्धतीने अंगणामध्ये खेळत होती. यावेळी अचानक छातीत दुखू लागल्याने आम्ही घाबरलो. आम्ही लगेचच तिला दवाखान्यात दाखल केलं. यावेळी डॉक्टरांनी तिच्या अनेक वेगवेगळ्या चाचण्या केल्या. छातीत दुखणे ही सामान्य गोष्ट नाही याकडे दुर्लक्ष करणे चुकीचे ठरेल त्यामुळे तिच्यावर वेगवेगळ्या चाचण्या करण्यात आल्या. तेव्हा तिची कोलेस्ट्रॉल लेव्हल वाढल्याचे समजले. एका वृद्ध व्यक्तीची कोलेस्ट्रॉल लेवल जितकी असावी तितकी अनवीची होती.” असे तिचे वडील म्हणाले.
त्यानंतर डॉक्टरांशी बातचीत केली असता समजले की, तिची कोलेस्ट्रॉल लेव्हल खूप जास्त वाढलेली होती. नऊ वर्षांच्या मुलांचे कोलेस्ट्रॉल लेवल हे साधारणतः १५० ते २०० एवढे असायला हवे. मात्र या मुलीची कोलेस्ट्रॉल लेवल ६०० झाली होती. त्यामुळे तिला छातीत दुखत होते आणि तिला हृदयविकाराचा झटका आला होता. डॉक्टर शिवप्रकाश कृष्णानाईक यांनी तिची बायपास सर्जरी केली. यावेळी ते म्हणाले की, माझ्या ३० वर्षांच्या कारकिर्दीत मी अशी केस पहिल्यांदाच पाहिली. या मुलीचे हृदय हे एका वृद्ध व्यक्तीप्रमाणे आहे. तिचा हा आजार अनुवंशिक असावा,” असे त्यांनी सांगितले.
अनवीची बायपास सर्जरी यशस्वीरित्या पार पडली आहे. आता तिला यामध्ये कोणताही त्रास होत नाही. तिला हायपकोलेस्ट्रोलमिआ हा आजर आहे. तिची बायपास सर्जरी यशस्वीरित्या पार पडली असली तरी देखील या आजारामुळे तिला आयुष्यभर औषध गोळ्या खावी लागणार आहेत.
गोळ्या चुकवल्यास तिला पुन्हा एकदा कोलेस्ट्रॉल वाढल्याचा त्रास होऊ शकतो. परिणामी तिला पुन्हा एकदा हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता आहे. असे असले तरी जर तिने औषधांचा कोर्स व्यवस्थित रित्या पूर्ण केला व तो कायम सुरू ठेवला तर ती इतर लहान मुलांप्रमाणे सुंदर आयुष्य जगू शकणार आहे.