इतर

निःशब्द! मॉल मध्ये खेळताना तीन वर्षांच्या मुलीने आई समोर सोडले प्राण; पुढे जे घडलं…

मुंबई | मुंबई शहरा जवळ असणारे घाटकोपर परिसरात एक अत्यंत दुर्दैवी व हृदयद्रावक घटना घडली आहे. आपन कायम रिकामा वेळ घालवण्यासाठी साठी किंवा फॅमिली ला टाईम देण्यासाठी काही न काही करत असतो. असाच एक आई वडील आपल्या चीमुकलीला येथे मॉलमध्ये घेऊन गेली होते.

 

साडेतीन वर्षांची चिमुकली दालिशा वर्मा चेंबूरच्या टिळकनगर परिसरात वास्तव्यास होती. ती तिच्या आई-वडिलांसह घाटकोपरच्या नील योग मॉलमध्ये (Neel Yog Mall Ghatkopar) गेली होती. जिथे ही दुर्घटना घडली आहे. या घटनेने दालिशाच्या पालकांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. आपली चिमुकली डोळ्यादेखत गेल्याने त्यांच्या डोळ्यातील अश्रू थांबत नाहीयेत. त्यामुळे आपल्या मुलांची काळजी घ्या. ते कुठे खेळत आहेत, ते सुरक्षित आहेत का याची खात्री करा.

 

दालिशा करण वर्मा ही आई-वडिलांसोबत घाटकोपरमधील नील योग मॉलमध्ये (Neel Yog Mall Ghatkopar) गेली होती. तिथे किड्स झोन झेनोक्स प्ले स्पेस याठिकाणी ती खेळण्यासाठी गेली.त्याच वेळेस काळ धाऊन आला. किड्स झोनमध्ये घसरगुंडीचा आनंद लुटत असताना अचानक तिचा तोल गेला आणि ती खाली पडली.

 

या घटनेत तिच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन ती बेशुद्ध पडली. तिच्या मेंदूतून रक्तस्त्राव होत असल्याचं लक्षात येताच तिला तात्काळ मुलुंडच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, डॉक्टर तिच्यावर उपचार करतील त्यापूर्वीच या चिमुकलीने जीव सोडला. या चीमुकळीच्या आत्म्यास शांती लाभो ही ईश्वर चरणी प्रार्थना. देव त्यांच्या कुटुबीयांना या दुःखातून सावरण्यास ताकत देवो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close