इतर

काळीज सुन्न करणारी घटना! ६ महिन्यांच्या गर्भवती महिलेची गळा चिरून केली हत्या, कारण जाणून धक्काच बसेल

मुंबई | प्रत्येक नात्यामध्ये संशय हा खूप मोठा शत्रू असतो. नाते कोणतेही असले तरी त्यामध्ये संशय आल्यास मोठमोठे गुन्हे घडतात. यात काहींचा जीव देखील जातो. यामध्ये अनेक पती पत्नी आपल्या जोडीदारावर संशय आल्यास त्यांच्या बरोबर मोठे भांडण करतात. यामध्ये दोघांचे देखील समान नुकसान होतं असते.

 

गाजियाबाद मध्ये असाच एक धक्कादायक प्रकार घडला आहे. यामध्ये पतीने सहा महिन्याच्या गर्भवती महिलेवरती चाकुरे वार केले आहेत. यात महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात शोकाकुल वातावरण पसरले आहे. मुलीचे कुटुंबीय मोठ्या दुःखात आहेत.

 

आपल्या पत्नीचा खून केल्यानंतर या पतीने स्वतः पोलीस स्टेशन गाठून आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. त्याने केलेला हा प्रकार अतिशय निंदनीय आहे. अंकित पाल आणि तनु पाल असे या दांपत्याचे नाव आहे. या नराधम पतीने आपल्या पत्नीच्या पोटातील सहा महिन्यांच्या बाळाचा देखील विचार केला नाही.

 

गाजियाबाद मधील नंदग्राम पोलीस स्टेशन हद्दीत मोठी गावामध्ये ही घटना घडली आहे. पहाटे तीनच्या सुमारास अंकित घरी आला. त्याने आपल्या पत्नीला झोपलेलं पाहिलं. त्यावेळी त्याने पत्नीच्या गळ्यावर चाकू फिरवला. त्यानंतर पोलीस स्टेशनला जाऊन तो म्हणाला की, मला अटक करा मी माझ्या पत्नीचा खून केला आहे. यावेळी त्याने हा प्रकार नेमका का आणि कशासाठी केला याविषयी पोलिसांनी विचारले असता त्याने सांगितले की, माझ्या पत्नीचे एका व्यक्तीबरोबर अनैतिक संबंध होते त्यामुळे मी हे पाऊल उचलले आहे.

साईबाबामधील गरिमा गार्डन येथे तनुचे माहेर होते. तिचे वडील रमेश पाल यांनी या घटनेबाबत सांगितले की, सहा वर्षांपूर्वी आम्ही आमच्या मुलीचे लग्नपत्रं पाल यांचा मुलगा अंकित पाल याच्याबरोबर लावून दिले होते. लग्नाच्या काही दिवसानंतर मुलीने आमच्याकडे तक्रार केली होती की करतात. आणखीन जास्त हुंडा घेऊन येण्यासाठी नेहमीच दबाव आणतात.

त्यामुळे हुंड्यासाठी माझ्या मुलीची या लोकांनी हत्या केली आहे. असे तिच्या वडिलांनी सांगितले. 14 ऑगस्ट रोजी ही घटना घडली आहे. या घटनेमध्ये गर्भवती महिलेचे शव पोलिसांनी ताब्यात घेतले असून पोस्टमार्टमला पाठवण्यात आले आहे. तसेच अंकित पाल हा देखील पोलिसांच्या अटकेत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close