भूमी अभिलेख कार्यालयाच्या विरोधात जनशक्तीचे अनोखे आंदोलन

माढा | सोलापूर जिल्ह्यातील माढा येथील भूमी अभिलेख कार्यालयाच्या विरोधात जनशक्ती संघटनेचे प्रमुख अतुल खूपसे पाटील यांनी अनोखे आंदोलन पुकारले आहे. या कार्यालयाच्या माध्यमातून नागरिकांना आणि शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याचा आरोप खूपसे पाटील यांनी केला आहे.
या कार्यालयात अनेक शेतकऱ्यांनी जमीन मोजणीसाठी अर्ज करून देखील त्यांच्याकडे या कार्यालया कडून दुर्लक्ष केलं जातं आहे. यामुळे शेतकरी वर्गात एकमेकांमध्ये वाद पेटत आहे. तसेच कोणतेही काम करण्यासाठी पैसे मागितले जात असल्याचा आरोप खूपसे पाटील यांनी केला आहे.
यात गट उतारा, फाळणी, भावाभावांची वाटणी, योजना पत्रक, स्कीम उतारा, सर्व्हे नंबर या सारखी मुख्य कामे या कार्यालयाच्या माध्यमातून अडवली जात आहेत. पाच पाच वर्षे वाट पाहून देखील कामे पूर्ण केली जात नसेल.
तसेच या कार्यालयातील कर्मचारी नागरिकांना आणि शेतकऱ्यांना उद्धटपने बोलत आहेत. बोलीभाषा व्यवस्थित वापरत नाहीत. यामुळे नागरिकांना प्रचंड त्रास होत आहे. यामुळे जनशक्ती संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने अनोखे आंदोलन करण्याचा इशारा खूपसे पाटील यांनी दिला आहे.
25 मे रोजी भूमी अभिलेख कार्यालयाच्या समोर प्रती भूमी अभिलेख कार्यालयाची स्थापना करून त्याठिकानाहून शेतकऱ्यांची आणि नागरिकांची कामे केली जाणार आहेत. त्या ठिकाणी जनशक्ती संघटनेच्या माध्यमातून क्लर्क तसेच विविध कर्मचारी ठेवण्यात येणार आहेत. असे अनोखे आंदोलन खूपसे पाटील यांनी पुकारले आहे. त्यामुळें या आंदोलनाची चर्चा चांगलीच रंगू लागली आहे.