इतर
दारू पिण्यासाठी थेट पोलिसांना फोन; तरुणाचा कारनामा पाहून आश्चर्य चकित व्हाल

तेलंगणा | २२ वर्षीय तेलंगणा मधील एका तरुणाने पोलिसांना फोन करून डायरेक्ट बियर मागण्याचा धक्कादायक प्रकार तेलंगणा मध्ये घडला आहे. तेलंगणा मधील हा तरुण बियर पिण्याच्या मोहात अडकला असताना त्याला पोलिसांच्या हेल्प लाईन नंबर १०० वर फोन केला व आपल्याला बिअर प्यायची आहे ती तुम्ही आणून द्या आशी मागणी केली.
हा तरुण येवढ्या वरच थांबला नाही तर त्याने पोलिसांशी हुज्जत घातली आणि म्हटला पोलीस हे पब्लिक सर्वंट आहेत. त्याने माणसांची सेवा केली पाहिजे. त्यांनी माणसांच्या गरजा पूर्ण केल्या पाहिजेत.
माझी पण एक अशीच गरज आहे ती म्हणजे मला बिअर पेयची आहे. ती तुम्ही आणून द्यावी ते तुमचा कर्तव्य आहे. त्यानंतर अश्या तेजस्वी लोकांचा पोलिसानी चांगलाच समाचार घेतला आहे. सध्याच्या पिढीतल्या तरुण कधी काय करेल सांगता येत नाही, यातच तरुण वर्ग सर्वात पुढे आहे.