आनंद चिंतामण दिघे साहेबांना धर्मवीर का म्हंटले जायचे ? जाणून घ्या

मुंबई|शिवसेनेचा सामान्य कार्यकर्ता म्हणुन कामं सुरु केलं त्यांच्या कामात इतकं झपाटलेपण होतं की त्यांनी लग्नं सुद्धा केला नाही असा ठाणे वैभव या वृत्तपत्राचे संपादक मिलिंद बल्लाळ सांगतात
शिवसेनेला सुरवातीच्या काळात ठण्यामधून सामान्यातून पुढाकार घेणारे आणि सामान्य जनतेला आपलेसे वाटणारे नेतृत्व हवे होते. त्यांनी बाळासाहेब पासून प्रवृत्त होऊन शिवसेनेसाठी काम करायचा ठरवला. दिघे ठाणे शहर प्रमुख झाल्या नंतर टेंभी नाक्यावरील कार्यालयातच राहू लागले.त्याचं वेळेस त्यांनी टेंभी नाका परिसरात आनंद आश्रम ची सर्वात केली .
या आश्रमात दरोरोज सकाळी जनता दरबार भरायचा या दरबारात आपल्या तक्रारी ऐकवण्यासाठी पहाटेपासून रांगा लागायच्या. दिघे पण लगेच तक्रारी सोडवायचे व गरज पडल्यास तेथूनच फोन करायचे .काही कामासाठी त्यांनी हात ही उचल्याचा सांगितला जात.असा त्यांचा दरारा असला तरी तो आदरयुक्त होता
दिघे यांना देवाधर्माच्या कामात विशेष रुची होती, त्यांनीच टेंभी नाक्यावरील नवरात्र उत्सव सुरु केला.सर्वात पहिल्यांाच सर्वात मोठा दहीहंडी उत्सवा दिघे यांनी टेंभी नाक्यावार सुरु केला आजही राज्याच्या कानाकोपऱ्यातून लोक आवर्जून भेट देतात .त्यांच्या याचं धार्मिक कार्यामुळे शिवसैनिकांनी त्यांना धर्मवीर ही उपाधी दिली