५ वर्षीय चिमुरड्याचा दुर्देवी मृत्यू, कारण जाणून धक्काच बसेल; डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही

छत्रपती संभाजीनगर | येथील बिडकीनी तालुक्यातील सोनपुरी गावात एक धक्कादायक घटना घडली आहे. पाच वर्षांच्या एका बाळाचा यात जीव गेला आहे. या बाळाची आई कामात असताना बाळ खेळत खेळत रस्त्यावर आलं होतं. यात त्याला रस्त्यावरील विजेच्या तारेचा झटका लागला आणि त्याचा मृत्यू झाला. यामुळे ग्रामस्थ जोरजोरात रडत आहेत.
रस्त्यावर विजेच्या तारा अश्याच मोकळ्या पडणे यात महावितरणाचा दोष आहे. या चिमुकल्या व्यक्तिरिक्त तिथे दुसरे कोणीही गेले असते तरी त्यांना देखील या विजेच्या तारेचा झटका लागला असता. अशात आपलं बाळ या जगात नाही हे ऐकुन त्याच्या वडिलांनी मोठा टाहो फोडला आहे. बाळाशिवाय जगणं हे त्याच्या पित्याला मान्य नाही. त्याने खूप रडून आक्रोश केला.
त्याला स्वतःला यातून सावरता येत नव्हते. ग्रामस्थांनी त्याला कसे बसे सावरले आहे. एकीकडे बाळाची आई देखील खूप दुखी आहे. ती देखील खूप रडत आहे. सदर मृत बाळाचे नाव अनस इलियास शेख असे आहे.
या बाळाची आई कामात होती. त्यामुळे हे बाळ खेळत खेळत रस्त्यावर आले. त्यावेळी त्याला या विजेच्या तारेचा झटका लागला. बाळ जेव्हा रस्त्यावर तरफडू लागलं तेव्हा इतर ग्रामस्थांनी आरडाओरडा करत त्याला त्या तरेपासून बाजूला केलं. तसेच त्याला नजीकच्या रुग्णालयात देखील नेले मात्र बाळाचा मृत्यू झाला होता.
अशात ग्रामस्थांनी बिडकीन पोलीस ठाण्यात याची माहिती दिली आहे. तसेच या घटनेवरती आक्रोश व्यक्त करत महावितरणाच्या कार्यालयाबाहेर गोंधळ करायला सुरुवात केली. मात्र पोलिसांनी सदर संतप्त ग्रामस्थांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला आहे.