इतर
राज्यात पुन्हा मास्कची होणार सक्ती? मुख्यमंत्री करणार घोषणा

मुंबई | गेल्या काही वर्षांपासून देशात कोरोनाने हाहाकार माजविला होता. त्यामुळे आर्थिक आणि सगळ्याच दृष्ट्या नियोजन बदलले होते. गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोनाचे कमी रुग्ण आढळत असल्यामुळे मास्क सक्ती हटवण्यात आली होती.
मात्र राज्य सरकार पुन्हा मास्क सक्ती करण्याच्या विचारात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सध्या देशात पुन्हा कोरोनाचे रुग्ण वाढताना पाहायला मिळत आहेत. त्यामुळे राज्य सरकार पुन्हा अलर्ट होताना पाहायला मिळत आहे.
राज्य टास्क फोर्स ने याबाबत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना अहवाल सादर केला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री ठाकरे कोणत्याही क्षणी मास्क सक्तीची घोषणा करण्याची शक्यता आहे. दिल्ली आणि कर्नाटक मध्ये देखील रुग्ण संख्येत मोठी वाढ होताना पाहायला मिळत आहे. त्या अनुषंगाने राज्य सरकार अलर्ट होण्याची शक्यता आहे