इतर

संघर्ष कथा -14व्यां वर्षी लग्न, 18व्यां वर्षी मूल, दहावी नापास तरी बनल्या लेडी सिंघम; वाचा खडतर प्रवास

मुंबई | धाडस, चिकाटी आणि प्रयत्न केल्याशिवाय कोणतीच गोष्ट सहज मिळत नाही असं म्हणतात. निश्चितच हे खरं आहे. अनेक व्यक्ती आपल्या आयुष्यात मोठ्या जिद्दीने परिस्थितीवर मात करून पुढे जातात. अशात मुंबई मधील लेडी सिंघम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महिला अधिकारी तुम्हाला माहीतच असतील. त्याचं पद पाहून अनेकांना त्यांचा अभिमान वाटतो. मात्र इथ पर्यंतचा त्याचा प्रवास प्रचंड खडतर वाटेचा होता. या बातमीतून त्याचा संघर्षमय प्रवास जाणून घेऊ.

 

अल्पवयीन असतानाच लग्न, १८ वर्ष पूर्ण होण्याआधीच पदरी एक मूल. शिवाय १० वी नापास पण मनात जिद्द कायम असलेली अंबिका आज डीसीपी पदावर कार्य करते. घरची परिस्थिती गरिबीची असल्याने लहान वयातच तिचं लग्न एका हवलदाराशी लावण्यात आलं. हेच आपलं पुढचं जीवन असं समजत तिने लग्नाला होकार कळवला.

 

 

त्यानंतर लग्न झाल्यावर १८ वर्षे पूर्ण होण्याआधीच तिला एक मुलगा देखील झाला. पती हवलदार असल्याने एक दिवस तो तिला घेऊन परेडला गेला होता. तेव्हा तिथे तिने पहिलं की, आपला पती त्याच्या पेक्षा मोठ्या साहेबांना सलाम करत आहे. त्याच वेळी तिच्या मनात देखील मोठं ऑफिसर व्हायचं असा विचार आला.

 

 

त्यावेळी शिक्षण कमी असल्याने तिने आपल्या पतीला विचारलं की, ते ऑफिसर व्हायला काय करावं लागेल. तेव्हा तिच्या पतीला तिचं बोलणं मस्करीच वाटल. त्यावर तिने पुन्हा एकदा पतीला हा प्रश्न विचारला आयपीएस अधिकारी बनण्यासाठी लागणारी सर्व माहिती मिळवली. तिने जेव्हा ही माहिती मिळवली त्यावेळी तिचं १० वी पर्यंत देखील शिक्षण झालं नव्हतं.

 

 

मात्र मनातली जिद्द फार मोठी होती. त्यामुळे तिने जवळच्या एका खासगी संस्थेतून १० वी आणि १२ वी उत्तीर्ण केली. त्यानंतर तिने १५ वी देखील दिली आणि UPSC परीक्षेचा अभ्यास सुरू केला.

 

 

अभ्यास करत असताना तिला अनेक अडचणी आल्या. कारण तिचं बाळ त्यावेळी लहान होतं. पतीची हवलदाराची नोकरी त्यामुळे घरातलं काम करून तिला अभ्यास करावा लागत होता. मात्र यात तिच्या पतीने तिला खूप मोलाची साथ दिली.

 

 

अनेक कुटुबांमध्ये असे अनेक पुरुष असतात ज्यांना आपल्या पत्नीने आपल्या पुढे गेलेलं पाहवत नाही. अगदी सुशिक्षित कुटुंब घेतली आणि पती पत्नी दोघंही नोकरी करणारे असेल तरी पती हा पत्नी पेक्षा दोन पैसे अधिक कमवणाराच दिसतो.

 

 

जसं एका यशस्वी पुरुषामागे एका स्त्रीचा हात असतो. तसचं एका स्त्रीला यशस्वी होण्यासाठी एका पुरुषाची साथ असणं गरजेचं असतं. हीच साथ अंबिकाला मिळाली. त्यामुळे ती पुढे मोठी झेप घेऊ शकली. ती दोन वेळा UPSC मध्ये नापास देखील झाली. मात्र तिच्या पतीने तिला धीर दिला त्यानंतर तिसऱ्या प्रयत्नात तिने विजय मिळवला.

 

 

हा प्रवास फक्त तिला पतीची योग्य साथ मिळाल्याने पूर्ण झाला. साल २००८ मध्ये तिने UPSC परीक्षेत यश मिळवलं. त्यानंतर डीजीपी हे पद देण्यात आलं. सध्या त्या मुंबईमधील झोन ४ मध्ये डीसीपी म्हणून कार्यरत आहेत. एका सामान्य अंबिका पासून ते अंबिका लेडी सिंघम पर्यंतचा त्यांचा हा प्रवास खरोखर खडतर वाटेचा होता. आज त्यांच्या लखलखत्या यशाने त्या अनेक स्त्रियांसाठी आदर्श बनल्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close