आमदार संजयमामा शिंदेंना मंत्रिपद मिळणार? ‘या’ पदासाठी हालचाली सुरू

करमाळा | करमाळा माढा विधानसभा मतदार संघाचे विद्यमान आमदार संजय मामा शिंदे यांना मंत्रिपद मिळणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आमदार शिंदे हे राष्ट्रवादी पुरस्कृत आमदार आहेत. त्यामुळे त्यांना संधी मिळू शकते. त्यासाठी दिग्गजांनी वरून सूत्र हलवायला सुरुवात केली आहे.
सध्या सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री पद दत्तात्रय भरणे यांच्याकडे आहे. मात्र लाकडी निंबोडी योजनेसाठी उजनी धरणातील पाणी ते इंदापूर तालुक्यासाठी घेऊन गेले आहेत. त्यामुळे भरणे यांच्या विरोधात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी शद्दु ठोकल्याचे पाहायला मिळत आहे.
राष्ट्रवादीच्या काही कार्यकर्त्यांनी थेट वरिष्ठांना पत्र लिहून आमचे पालकमंत्री बदला अशी विनंती केली आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या पालकमंत्री पदासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. दत्तात्रय भरणे यांना या पदावरून हटवलं जाऊ शकत. त्यांच्या जागी आमदार शिंदे यांना संधी दिली जाऊ शकते.
आमदार बननदादा शिंदे आणि आमदार संजयमामा शिंदे हे दोन्ही सुरुवातीपासून राष्ट्रवादी काँग्रेस सोबत एकनिष्ठ आहेत. त्यामुळे पक्षश्रेष्ठी संजय शिंदेंना संधी देण्यासाठी प्रयत्न करत असल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे येत्या काळात जिल्ह्याच्या राजकारणात मोठी उलथपालथ होणार असल्याचे दिसत आहे.