निःशब्द! एकाच साडीला शेतकरी पती पत्नीने घेतला गळफास; वाचून डोळ्यात पाणी येईल

उस्मानाबाद | आपल्या देशात शहरांमध्ये मोठ मोठे प्रोजेक्ट आणि मेट्रो ट्रेन सारखे प्रकल्प सुरू आहेत. मात्र आजही आपला बळीराजा सुखी नाही. अनेक व्यक्ती लग्न करत असताना मुलगी अशिक्षित जरी असली तरी शेतकरी पती करून देत नाहीत. हे खरं वास्तव आहे. अशात उस्मानाबाद येथील एका गावातील एका दांपत्याने कर्जबाजारी होऊन स्वतःचे जीवन संपवले आहे. या पती पत्नीने एकत्र गळफास घेतला आहे. यामुळे सगळीकडे मोठी खळबळ उडाली आहे.
कळंब तालुका नायगाव येथे प्रकाश वसंत दीक्षित (३०) पत्नी अश्विनी (२६) आणि आई तसेच दोन मुलांबरोबर राहत होता. प्रकाश आणि आश्र्विनी या दोघांना एक मुलगा आणि मुलगी होती. आता हे दोघे पती पत्नी या जगात नसल्याने त्यांची लेकरं अनाथ झाली आहेत. या घटनेने आता आजीबाईवर नातवांची संपूर्ण जबाबदारी आली आहे. सोमवारी सकाळी ही घटना घडली. या घटनेने संपूर्ण गाव हळहळ व्यक्त करत आहे.
प्रकाशचे वडील काही वर्षांपूर्वी वारले. त्यामुळे त्याच्याकडे जेमतेम ४ एकर जमीन होती. या जमिनीत शेती करून त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह होतं होता. मात्र वरुणराजा नीट बरसत नसल्याने प्रकाशचा शेती व्यवसाय चालत नव्हता. त्यामुळे घर खर्चासाठी त्याने अनेक व्यक्तींकडून उधारी घेतली होती. शेवटी आपली दिड एकत्र जमीन त्याने विकली. मात्र त्यातून सर्वच कर्ज फिटले नाही. अजूनही बरीच रक्कम द्यायची बाकी होती.
या मुळे त्याच्यात आणि त्याच्या पत्नीत सतत वाद होत होते. मात्र अश्विनी तिच्या पतीला खूप साथ देत होती. अशात रविवारी रात्री सोनार गल्ली येथील घरात हे सर्वजण झोपले होते. दोन्ही मुलं आजी जवळ झोपली होती. तर पती पत्नी दोघेही आतल्या खोलीत झोपले होते. सोमवारी सकाळी बराच वेळ त्या दोघांनी दार उघडले नाही म्हणून आजी त्यांना आवाज देऊ लागली. मात्र आतून कोणीच काहीच बोलत नव्हतं. त्यामुळे आजीने दार पुढे सरकवले त्यावेळी मुलगा आणि सुन दोघेही लोखंडी वासाला लटकलेले दिसले.
आपल्या मुलाला आणि सुनेला पाहून आजी खूप जोरात ओरडली. संपूर्ण गाव घटनास्थळी दाखल झाला. यावेळी शिराढोन पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी सांगितले की, कर्जाच्या विळख्यात सापडल्याने त्यांनी राहत्या घरी एकाच साडीने घराच्या वासाला फाशी घेतली आहे. पोलिसांनी या दोघांचे शव ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवले. तसेच सोमवारी रात्री उशिरा या दोघांना अग्नी देण्यात आली. आता आजी आणि दोन मुलं हेच एकमेकांना जीवनाचा आधार उरले आहेत.