इतर
राज ठाकरेंच्या ताफ्यातील गाड्यांचा अपघात; सभेला जाण्यापूर्वी अनर्थ टळला

अहमदनगर | मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे महाराष्ट्र दिनानिमित्त औरंगाबाद येथे सभा घेणार आहेत. उद्या सभा असल्यामुळे आज ते औरंगाबाद ला गेले आहेत. औरंगाबाद मध्ये त्यांचं जंगी स्वागत करण्यात आले आहे.
मात्र अहमदनगर मार्गी ते औरंगाबाद ला जात असताना त्यांच्या ताफ्यातील गाड्यांना अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. या अपघात कोणीही जखमी झाले नाही. हा अपघात छोटा होता.
त्यामुळे अनर्थ टाळला, ठाकरेंचा ताफा यावेळी न थांबता तसाच पुढे निघाला, औरंगाबाद मध्ये पोहचल्यावर त्यांच्या गाड्यांवर फुले उधळण्यात आली तसेच त्यांचा जंगी सत्कार करण्यात आला आहे.