सख्खे भाऊ पक्के वैरी, या कारणामुळे अमिताभ बच्चन आपल्या लहान भावाचे तोंडही पाहत नव्हते!

मुंबई | पद्मभूषण पुरस्कार सन्मानित हिंदी सिनेसृष्टीतील सोनेरी अक्षराने लिहिले गेलेल्या नावांमध्ये हरिवंश राय बच्चन हे नाव आज देखील अबाधित आहे. कविता आणि लेखणी या दोन्ही गोष्टींच्या जोरावर हरिवंश राय बच्चन यांनी हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये मोठी झेप घेतली होती. आपल्या वडिलांप्रमाणे अमिताभ बच्चन यांनी देखील हिंदी सिनेसृष्टीत दमदार कामगिरी केलेली आहे. मात्र त्यांनी आपल्या करिअरसाठी अभिनय हे क्षेत्र निवडले. अभिनयामध्ये आजवर त्यांनी बरीच दशके काम केले.
अमिताभ बच्चन यांच्या कुटुंबामध्ये असलेल्या त्यांच्या पत्नी जया बच्चन, मुलगा अभिषेक बच्चन आणि त्याची पत्नी ऐश्वर्या राय बच्चन तसेच अमिताभ यांची नात आराध्या बच्चन या सर्वांना तुम्ही ओळखतच असाल. मात्र आज आम्ही तुम्हाला बच्चन कुटुंबातील एका खास व्यक्तीची ओळख करून देणार आहोत. या व्यक्तीने अमिताभ बच्चन यांच्या आयुष्यात महत्वपूर्ण कामगिरी बजावली. अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटसृष्टीच्या कारकिर्दीला चालना देण्यासाठी त्यांनी प्रचंड धडपड केली.
त्यांचे नाव आहे अजिताभ बच्चन. अजिताभ हे अमिताभ बच्चन यांचे सख्खे भाऊ आहेत. साल १९५२ मध्ये अजिताभ यांचा जन्म झाला. अमिताभ यांचे ते लहान भाऊ आहेत. लहान भाऊ असले तरी देखील एका मोठ्या भावाप्रमाणे त्यांनी नेहमीच अमिताभ यांना साथ दिली. ज्यावेळी त्यांना समजले की आपल्या मोठ्या भावाला अभिनय क्षेत्रात करिअर करायचे आहे त्यावेळी त्यांनी खूप मेहनत घेतली. अमिताभ यांचे फोटो घेऊन ते वेगवेगळ्या दिग्दर्शकांची दारे ठोठावत होते. मात्र अमिताभ यांची उंची पाहून अनेक जण त्यांना चित्रपटांमध्ये काम देण्यास नकार देत होते. मात्र अजिताभ यांनी त्यांचे प्रयत्न सोडले नाही. आपल्या भावाचे स्वप्न पूर्ण होईपर्यंत त्यांनी संघर्ष केला.
अखेर त्यांच्या प्रयत्नाला यश आले. साल १९६९ रोजी अमिताभ यांना सात हिंदुस्तानी या चित्रपटामध्ये काम करण्याची संधी मिळाली. सुरुवातीला अमिताभ यांचे चित्रपट फारसे चालत नव्हते. त्यामुळे अजिताभ कोलकात्याला निघून गेले होते. अमिताभ बच्चन यांचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर मोठे हिट होऊ लागले तेव्हा ते पुन्हा अमिताभ बच्चन यांच्याकडे आले. त्यानंतर त्यांनी अमिताभ यांचे मॅनेजर म्हणून काम पाहिले. चित्रपट अमिताभ बच्चन यांच्याकडे येण्याआधी अजीताभ बच्चन यांच्याकडे येत होता. सर्व कामकाज खूप छान पद्धतीने सुरू होते.
अजीताभ हे थोडे लाजाळू स्वभावाचे आहेत. त्यामुळे त्यांना मीडियासमोर येणे आणि आपले खाजगी आयुष्य लोकांना सांगणे अजिबात आवडत नाही. अमिताभ बच्चन यांनी आपल्या लहान भावाचे लग्न लावून दिले होते. त्यांना रमोला फार आवडत होत्या मात्र त्यांना मनातली गोष्ट सांगण्याची त्यांची हिंमत नव्हती. त्यामुळे अमिताभ बच्चन यांनी त्या दोघांचे बोलणे करून दिले तसेच दोघांचे लग्न देखील लावून दिले. त्यानंतर अजिताभ बच्चन लंडनला रवाना झाले. इथे त्यांनी स्वतःचा व्यवसाय सुरू केला. यावरती त्यांनी प्रचंड यश मिळवले. एकीकडे त्यांचा व्यवसाय प्रगतीपथावर होता तर दुसरी कडे अमिताभ यांची बॉलीवूडची कारकीर्द यशाचा शिखर गाठत होती. सर्व काही छान सुरू असताना मध्येच बोफोर्स घोटाळा हे प्रकरण सुरू झाले. यात अमिताभ बच्चन यांची चौकशी झाली. याचा फटका अजिताभ यांच्या व्यवसायावर आला. त्यांच्याकडे एवढा मोठा व्यवसाय सुरू करण्यासाठी पैसे कुठून आले याची चौकशी केली गेली.
या घटनेमुळे अमिताभ बच्चन आणि अजिताभ बच्चन या दोघांमध्ये वाद निर्माण झाले. त्यानंतर बरेच दिवस या दोघांनी एकमेकांचे तोंड देखील पाहिले नाही. दोघेही एकमेकांशी बोलत नव्हते. त्यांच्या कुटुंबामध्ये होत असलेल्या समारंभांमध्ये देखील हे दोघे जात नव्हते. दोघेही सख्खे भाऊ एकमेकांचे पक्के वैरी बनले होते. त्यांच्यातील वाद इतका वाढला होता की अमिताभ बच्चन यांनी अभिषेक बच्चनच्या लग्नाला देखील त्यांच्या लहान भावाला बोलवले नव्हते. मात्र भावांमधील हा राग लवकरच मिटला. अजिताभ बच्चन यांची मुलगी नैना हिच्या लग्नावेळी हे दोन भाऊ एकमेकांबरोबर बोलू लागले. या लग्नामध्ये ते पुन्हा एकदा एकत्र आले.