चार बहिणींचा एकुलता एक भाऊ गमावला; बहिणींनी केला हृदय द्रावक आक्रोश; तुमचेही डोळे पनवतील

जळगाव | जळगाव जिल्ह्यामध्ये एका भीषण अपघातात एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. हा तरुण आपल्या रिक्षाने धान्य घेऊन जात होता. अचानक रिक्षा बंद पडल्याने त्याला आपला जीव गमवावा लागला आहे. त्याच्या पश्चात चार बहिणी आणि आई असा परिवार आहे. लहानपणीच त्याचे बाबा वारले. त्यामुळे चार बहिणी आणि आईसाठी तो एकुलता एक आधार होता. एकुलता एका मुलाच्या निधनाने त्याच्या आईवर आणि चारही बहिणींवर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला आहे.
देवा तू इतका क्रूर का झालास…. असे म्हणण्याची वेळ या बहिणींवर आली आहे. जळगाव जिल्ह्यात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. धरणगाव चोपडा रोड येथील जिनिंग जवळ तरुणाचा आकस्मित मृत्यू झाला. आशिष गजानन भावसार असे मृत तरुणाचे नाव आहे. वयाच्या फक्त 32 व्या वर्षी त्याची प्राणज्योत मालवली आहे. चार बहिणींचा एकुलता एक भाऊ गेल्याने चौघींनी देखील रडून मोठा आक्रोश केला.
धरणगाव येथील परोळा नाका येथे आशिष आपल्या आई आणि बहिणींबरोबर राहत होता. तो एक किरकोळ विक्रेता म्हणून काम करायचा. आपल्या रिक्षामध्ये शेतात पिकवलेले धान्य भरून छोट्या छोट्या गावांमध्ये जाऊन विकायचा. रविवारी एम एच 15 इजी 6305 या रिक्षाने तो नेहमीप्रमाणे घरातून निघाला.
सकाळी 8.30 च्या सुमारास त्याने आपली रिक्षा गावाबाहेर काढली. कमल रोडवरील जिनिंग जवळ जेव्हा तो पोहोचला तेव्हा कुणास ठाऊक काय झाले पण त्याची रिक्षा रस्त्यातच बंद पडली. तो रिक्षा चालू करण्याचा प्रयत्न करत होता मात्र रिक्षा काही चालूच होत नव्हती. तितक्यात मागून वेगात एक गाडी आली. त्या गाडीने आशिषच्या रिक्षाला धडक दिली. यामध्ये त्याच्या रिक्षाचा मोठा अपघात झाला.
या अपघातात त्याचे पाय आणि डोके गंभीर रित्या जखमी झाले. घटना घडल्यानंतर उपस्थित व्यक्तींनी त्याला तातडीने रुग्णालयात नेले. गंभीर दुखापत झाल्याने त्याचा प्रचंड रक्तस्त्राव देखील झाला होता. त्यामुळे रुग्णालयात जात असताना रस्त्यातच त्याने प्राण सोडले. ही घटना संपूर्ण गावात वाऱ्याच्या वेगाने पसरली. आशिष हा खूप साधा सरळ आणि कष्टाळू मुलगा होता. तो फार कुणाशी बोलायचा नाही मात्र कुणाला गरज लागली तर त्या व्यक्तीच्या मदतीला तो धावून जायचा. आता त्याचे निधन झाल्याने ग्रामस्थ देखील त्याच्या आठवणीने व्याकुळ होत आहेत. सदर घटनेची नोंद पोलिसांनी देखील घेतलेली असून याबाबत अधिक तपास सुरू आहे.