इतर

खेळायला गेला आणि आयुष्याचाच खेळ झाला… ५ वीच्या विदयार्थ्यावर काळाचा घाला; संपूर्ण प्रकार जाणून अंगावर शहारे येतील

मुंबई | खेळण्याबागण्यासाठी मुलं कुठेही जात असतात. काहीही धाडस करत असतात. अशाच एका शालेय मुलावर त्याचा खेळच काळ बनून आला. खेळत असताना पाय घसरून तलावात पडला आणि त्याचा श्वास कायमचा थांबला.  भंडारा जिह्यातील एका गावात घडलेल्या दुर्घटनेत या अवघ्या बारा वर्षाच्या मुलाला आपला जीव गमवावा लागला. पोटच्या मुलाच्या जाण्याने त्याच्या पालकांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

भंडारा जिल्ह्यात तुमसर तालुक्यातील एका छोट्याशा गावात ही घटना घडली. अजूनही या गावातील लोक सुन्न आहेत. गावातील शाळेत पाचवीत शिकणारा देवेंद्र अजय बोंद्रे याच्या बाबतीत ही दुर्दैवी घटना घडली आहे. देवेंद्र गावातील तलावानजीक खेळत असताना त्याचा पाय घसरला, तोल न सावरता आल्याने तो तलावात पडला. बघता बघता तो गटांगळया खाऊ लागला आणि बुडाला.  त्याला तातडीने हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले मात्र त्याचा बुडून मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगताच पालकांनी एकच हंबरडा फोडला.

देवेंद्र शाळेत गेला होता. शाळेच्या मधल्या सुट्टीत डबा खाल्यानंतर तो मित्रांसोबत तलावाजवळ खेळण्यासाठी गेला होता. त्याच्यासोबत त्याचे दोन मित्रही होते. खेळत असताना निसरडं झाल्याने तलावाजवळून त्याचा पाय घसरला आणि तो पडला. पुढचा सारा अनर्थ घडला. नेहमीसारखा शाळेत गेलेला देवेंद्र पुन्हा घरी परत आलाच नाही.

देवेंद्रसोबत असलेल्या मित्रांनी आरडाओरड केली असता गावकऱ्यांनी तलावाच्या दिशेने धाव घेतली. देवेंद्रला वाचवण्यासाठी गावकऱ्यांनी प्रयत्न केले. देवेंद्रला पाण्यातून बाहेर काढण्यात गावकऱ्यांना यशही आलं, मात्र हॉस्पिटलमध्ये आणण्यापूर्वीच देवेंद्रचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी घोषित केलं.मृत देवेंद्र हा शिक्षणासाठी तुमसर या गावात मामाकडे शिक्षणासाठी राहत होता. तो मूळचा निलज येथील रहिवाशी आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close