इतर

आई न तू तर वैरीण! स्वतःच्या तीन मुलींना पाजले विष, कारण जाणून डोळयात पाणी येईल

दिल्ली | माणसाचा सर्वात मोठा शत्रू हा राग असतो. स्वतःच्या रागावर नियंत्रण मिळवू शकणारी प्रत्येक व्यक्ती संपूर्ण जग जिंकू शकते. राग अनावर झाल्यास एखादी व्यक्ती काय करेल आणि काय नाही याचा काहीच नेम नसतो. कारण रागाच्या भरात माणूस डोक्याने नाही तर मनाने विचार करत असतो. त्यामुळे मनाचा हा विचार नेहमीच चुकीचा ठरतो.

अशात एका आईने असाच रागाच्या भरात विचार करून एक घृणास्पद काम केले आहे. त्या आईने केलेले हे कृत्य पाहून तुम्हाला देखील खूप चिड येईल. तसेच एक आई असे काही करू शकते यावर तुमचा विश्वासही बसणार नाही. मात्र या आईने केलेले कृत तिच्या मातृत्वाला काळिंबा फासणारे आहे. प्रत्येक आई आपल्या मुलांच्या भवितव्यासाठी झटत असते. आपण जे सुख अनुभवले नाही ते आपल्या मुलांनी अनुभवावे असे प्रत्येक आईला वाटत असते.

त्यामुळे प्रत्येक आई आपल्या बाळाच्या संगोपनात कसुभरही मागे पडत नाही. काही माता इतरांच्या घरची धुनी भांडी करून आपल्या मुलांना शाळा शिकवतात. तसेच त्यांचे योग्य पद्धतीने पालन पोषण करतात. वेळप्रसंगी दम देऊन योग्य ते संस्कार देखील देतात. मात्र या घटनेमध्ये या आईने आपल्या मुलांना कोणतेही संस्कार किंवा कोणतीही शिक्षा नाही तर त्यांचा जीव घेतलेला आहे.

उत्तर प्रदेशातील गाजीपुर येथे हा भयावह प्रकार घडला आहे. यामध्ये एका आईने आपल्या एक नाही तर तीन मुलींचा जीव घेतला आहे. रागअनावर झाल्याने या आईने आपल्या तिन्ही मुलींना विष पाजले आहे. विष पिऊन या तिन्ही बाळांचा जीव गेला आहे.

सदर घटना सुहवाल पोलीस स्टेशन हद्दीत घडली आहे. इथे एक महिला आपल्या पती आणि तीन मुलींबरोबर राहत होती. तिचे पतीबरोबर भांडण झाले. पतीबरोबर झाडलेल्या भांडण झाल्यानंतर तिला खूप राग आला. आपल्या पतीचा बदला घ्यायचा म्हणून तिने स्वतःच्या मुलींनाच विष पाजले. तिच्या या कृत्यामुळे संपूर्ण परिसरात तिच्याविषयी वाईट बोलले जात आहे.

त्या महिलेने आपल्या तिन्ही मुलींना विश पाजल्यानंतर त्यातील दोन मुली जागीच मेल्या. त्याचबरोबर एका मुलीला रुग्णालयात दाखल करण्यात आले तिच्यावर उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यान त्या मुलीने देखील या जगाचा निरोप घेतला. सदर घटनेबाबत पोलिस अधिक तपास करत आहेत. त्याचबरोबर आरोपी महिलेला ताब्यात देखील घेतले आहे.

ही महिला मनोरुग्ण असल्याची शंका व्यक्त केली जात आहे. महिलेने इतके क्रूर पाऊल का उचलले. पतीचा बदला घेण्यासाठी तिला दुसरा मार्ग नव्हता का? असे अनेक प्रश्न उपस्थित राहत आहेत. मात्र या संपूर्ण प्रकरणी अजून महिलेची प्रतिक्रिया समोर आलेली नाही. तिची प्रतिक्रिया समोर आल्यानंतरच या हत्याकांडाचे गूढ उलगडणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close