छोट्याशा चुकीने गेला चार वर्षीय मुला सोबत बापाचा जीव, सांगलीतील घोगरे कुटुंबावर पसरली शोककळा.

सांगली : सांगली जिल्यातील शिराळा तालुक्यात दुर्देवी घटना घतली. देवदर्शनासाठी निघालेले बाप लेक अपघातात जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे. कराड रत्नागिरी या रस्त्यावर वारणा नदीवरील पुलावर हा अपघात झाला.अपघात इतका भयानक होता की त्या ठिकाणी बाप लेकीचा जागेवरच मृत्यू झाला. गाडी चालवताना रस्त्याचा अंदाज न आल्यामुळे हा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार महिंद्र अशोक घोगरे वय ३५ वर्षे आणि त्याचा मुलगा आरव महिंद्र घोगरे हा चार वर्षाचा मुलगा हे दोघेजण देवदर्शनासाठी पुण्याहून रत्नागिरी येतील गणपतीपुळे येथे निघाले होते. पुण्याहून रत्नागिरी जात असताना शिराळा तालुक्यात कोकरुड या ठिकाणी त्यांच्या गाडीला अपघात झाला.
कोकारुड पुलावर दुपारच्या वेळी चालक ऋषिकेश घोगरे यांना अंदाज आला नाही त्यामुळे संरक्षण भिंतीवर त्याची गाडी धडकली . ही घडक इतकी जोरदार होती की चालकाच्या बाजूला बसलेले महिंद्र घोगरे आणि त्यांचा चार वर्षाचा मुलगा जागीच ठार झाले.
या गाडीत बसलेले घोगरे परिवार हे जखमी झाले असून त्यांना हॉस्पिटल मध्ये उपचार करण्यासाठी घेऊन गेले आहे. या जखमी मध्ये रेणुका घोगरे, शिवेंद्रा घोगरे, रुपाली घोगरे, ऋषिकेश घोगरे यांचा समावेश आहे. या अपघातामुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. घोगरे कुटुंबावर दोन व्यक्ती गेल्याने शोककळा पसरली आहे.