दुदैवी, क्रूरतेचा कळस, छोट्याशा चुकीमुळे डॉकटर तरुणीला कुटुंबातील व्यक्तींनी संपवले, संपुर्ण प्रकार वाचुन डोळयात पाणी येईल.

नांदेड : एका छोट्याशा चुकीमुळे डॉकटर तरुणीला जाळून टाकल्या ची घटना नांदेड शहरात घडली आहे. नांदेड पासून जवळच असलेले महिपाल पिंपरी या गावात प्रेमप्रकरणातून घरातील लोकांनीच तरुणीला जाळून टाकल्या ची घटना घडली आहे. ही घटना 26 जानेवारी रोजी उघडकीस आली. मुलीचा खून करून जाळून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला गेला होता.
मिळालेल्या माहिती नुसार शुभांगी जनार्दन जोगदंड या तरुणीचा खून झाला आहे. ही तरुणी नांदेड मधील आयुर्वेद महाविद्यालयात शिक्षण घेत होती. तिचे गावातील मुलासोबत प्रेम संबंध होते. कुटुंबातील लोकांनी तिची समजूत काढली होती. तसेच तिचे लग्न दुसरीकडे जमवले होते. परंतु वराकडील लोकांना शुभांगी चे प्रेम संबंध समजले त्यामुळे त्या लोकांनी लग्न मोडले. गावात बदनामी झाली याचा राग कुटुंबातील लोकांना होता. त्यामुळे मुलीच्या मामांनी आणि वडिलांनी मिळून शुभांगीचा गळा रुमालाने बांधून खून केला. नंतर विजेचा धक्का बसल्याचा बनाव केला.
त्यांनी रात्रीच्या वेळी शुभांगी चा मृतदेह शेतात घेऊन गेले आणि तेथे त्यांनी पूर्णपणे जाळला. पहाटे शुभांगीची राख जवळच असलेल्या गोदावरी नदीमध्ये फेकून दिली. आरोपी हे गावामध्ये काही न घडल्यासारखे हिंडत होते. ते नेहमीच्या प्रमाणे नेहमीचे काम करत होते.
मुलीचा खून करत असताना हात थरथर कापू नये यासाठी सगळ्या आरोपींनी दारू पिली होती. खुनाचा पुरावा नष्ट करण्यासाठी आरोपींनी शेतात पाणी सोडून त्या ठिकाणी नांगर फिरवला होता.
पोलिसांनी खून करणाऱ्या पाचही आरोपींना अटक केली आहे.या घटनेचा पोलीस तपास करत आहेत. तपास पूर्ण झाल्यावर पुढील माहिती देऊ असे पोलिसांनी सांगितले. या घटनेमुळे परिसरात नागरिकांनी हळहळ व्यक्त केली तर मुलीच्या घरातील व्यक्तींनी खून केल्यामुळें संताप व्यक्त केला आहे.