विशेष

निःशब्द: तीन वर्षांच्या बाळा तुझी काय रे चूक, शेजारच्या सासु सुनेने मिळून संपवला बाळाचा जीवनप्रवास. गाव हळहळले

परभणी: गेले काही दिवसापासून गुन्हेगारी क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. परभणी शहरात सासु सुनेने एका तीन वर्षाच्या चिमुरड्याचा खून करून घरातील फरशी खाली गाडून ठेवल्याची घटना घडली आहे. कधी घटना परभणी शहरातील पूर्णा तालुक्यामध्ये असणाऱ्या काळगाव या गावांमध्ये घडली. अन्नपूर्णा बनगर आणि कावेरी बनगर असे आरोपींची नावे आहेत. या दोन महिलांनी तीन वर्षाच्या बालकाचा खून करून घरातील फरशी खाली गाडून ठेवल्याची घटना घडली आहे. या गुन्ह्याची तक्रार ताडकळस येथील पोलीस स्टेशनमध्ये नोंदवण्यात आलेले आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार पूर्णा तालुक्यातील राहत असलेले गणेश भिमराव धोत्रे यांनी ताडकळस येथील पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली आहे. त्यांनी तक्रारी मध्ये असे नोंदवले आहे की त्याची पत्नी शेतामधून घरी येत असताना त्याचा लहान मुलगा गोविंद गणेश धोत्रे हा बेपत्ता झाला. त्याचे कोणीतरी अपहरण केलेले आहे. पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवला गेला. यावर कार्यवाही पोलीस करत होते. तीन वर्षाच्या बालकाला शोधण्याचा प्रयत्न करत होते. त्यासाठी पोलिसांनी मुलाला शोधण्यासाठी चार पथके नेमली होती.

 

गणेश धोत्रे यांचा मुलगा गोविंद धोत्रे हा बे पत्ता झालेला असतानाच पोलीस त्याचा शोध घेत होते तेव्हा पोलिसांना त्यांच्या गुप्तहेरण कडून माहिती मिळाली की गोविंद नावाचा चिमुरड्याचे अपहरण आणि त्याची हत्या त्या भीमराव धोत्रे यांच्या शेजारी राहणाऱ्या सासु सुनेने केली आहे. त्यामुळे पोलिसांनी तपास करत असताना कावेरी बनगर आणि अन्नपूर्णा बनगर यांना ताब्यात घेतले. या दोघांची कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी गुन्हा कबूल केला.

 

कावेरी बनगर आणि अन्नपूर्णा बांगर यांनी सांगितले की जुन्या भांडणाचा राग मनात धरून आम्हीच त्याला त्याच्या घरातील अंगणात मधून उचलून आणून घरी आणले आणि हत्या केली. त्याचा खून करून आम्ही त्याला घरातील फरशी खाली करून ठेवले आहे. कावेरी पण घरी या महिलेने ही माहिती पोलिसांना दिली. ही माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी तहसीलदाराच्या मदतीने जाऊन त्यांच्या घरातील फरशी खाली पुरलेला तीन वर्षाच्या बालकाचा मृतदेह बाहेर काढला.

 

तसेच पोलिसांनी संबंधित आरोपी कावेरी बनगर आणि अन्नपूर्णा बनगर यांना अटक केली आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत तपस पूर्ण झाल्यावर पुढची माहिती देऊ असे पोलिसांनी सांगितले. या घटनेमुळे परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. तसेच कावेरी बनगर आणि अन्नपूर्णा बंकर यांच्या कृत्यामुळे त्यांच्यावर लोकांनी संताप व्यक्त केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close