विशेष

धक्कादायक : भीमा नदी सापडले एकाच कुटुंबातील सात जणांच मृतदेह, आत्महत्या नाही तर झाला खून. कारण जाणुन धक्काच बसेल 

पुणे: पुणे जिल्ह्यात एकच कुटुंबातील सात जणांचे मृतदेह आढळल्याने पुण्यामध्ये खळबळ उडाली आहे. भीमा नदीच्या पात्रातून हे सात मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. सुरुवातीला ही नदीमध्ये बुडून मृत झाले चे संशय व्यक्त केला जात होता, परंतु पोलिसांचे तपासात वेगळेच वळण लागले आहे. ही घटना दौंड तालुक्यात असलेले पारगाव या ठिकाणी घडली आहे.

 

सुरुवातीला 18 जानेवारी रोजी एका महिलेचा मृत्यू सापडला होता. त्यानंतर 19 तारखेला अजून एका व्यक्तीचा या नदीपात्रातून बाहेर काढला होता. सलग तिसऱ्या दिवशी म्हणजे वीस तारखेला सुद्धा एका महिलेचा मृतदेह या नदीपात्रात सापडला. पुन्हा दुसऱ्या दिवशी नदीच्या पाण्यावरती एका व्यक्तीचा मृतदेह तरंगताना दिसला. असे करत करत 18 ते 21 तारखेपर्यंत चार मृतदेह भीमा पात्रात सापडले. हे सर्व होत असताना पोलिसांनी पुन्हा एकदा नदीपात्रामध्ये काही सापडते का हे पाहण्यासाठी शोध मोहीम चालू केली.

 

पोलिसांना शोध मोहीम चालू असतानाच वेगवेगळ्या ठिकाणी आणखी तीन छोट्या छोट्या मुलांचे मृतदेह सापडले. पोलिसांना तपास करत असताना कळले की हे सर्व मृत सात जण एकाच कुटुंबातले आहेत. या मृतांमध्ये मोहन पवार, संगीता पवार, शामराव फुलवरे, राणी फुलवरे, रितेश फुलवरे, छोटू फुलवरे, कृष्णा फुलवरे हे आहेत. या सर्वांची मृत देह हे भीमा पत्रा सापडलेले असून 18 ते 21 तारीख या दरम्यान हे सर्व सात मृतदेह आढळले आहेत. दौंड तालुक्यात असलेली पारगाव या ठिकाण चे हे सगळे आहेत. एकाच वेळी एकाच कुटुंबातील सगळे मृत पावले यामुळे पुणे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

 

पोलिसांनी या सर्व व्यक्तींचे मृतदेह पोस्टमार्टम साठी पाठवले आहे. त्यातील लहान मुले वगळता चार जणांचे पोस्टमार्टम करण्यात आले आहे. पोस्टमार्टम मध्ये त्यांच्या शरीरावर कुठल्याही प्रकारच्या खुणांचा समावेश दिसत नव्हता. त्यामुळे हे मर्डर नसून बुडून मृत्यू झाले असल्याचे संशय व्यक्त केला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार मोहन आणि संगीता हे बीड जिल्ह्यातील होते. तसेच त्यांची मुलगी आणि जावई हे उस्मानाबाद जिल्ह्यातील आहेत. हे सर्वजण नोकरी व्यवसाय करण्याचे निमित्ताने पुणे येथे राहत होते.

आरोपी अशोक पवार याचा भाऊ धनंजय पवार यांचा अपघातात जागीच मृत्यू झाला होता. मात्र धनंजयच्या अपघाताला हे पवार कुटुंब कारणीभूत होतं, असा समज आरोपींचा होता. याच रागातून आोरपींनी ही हत्या केली कारण समोर आले आहे.

 

करणी किंवा काली जादू यातून हे मृत्यू झाल्याचा अंदाज आधी वर्तवण्यात आला होता. तो खोठा ठरला आहे. मात्र पोलीस तपासात हा अंदाज खोटा ठरला असून, ठरवून केलेले हत्याकांड असल्याचे उघड झाले आहे.

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close