दुर्दैवी : औरंगाबाद शहरात एकच ठिकाणी दोन सख्या बहिणीचा आढळून आला मृतदेह.

औरंगाबाद : औरंगाबाद मधील कन्नड तालुक्यात एक मनाला चटका लावणारी घटना घडली. एकाच कुटुंबातील दोन तरुण मुली गेल्या मुळे चव्हाण कुटुंबावर शोककळा पसरली आहे. गेल्या काही दिवसापासून या दोन मुली बेपत्ता झाल्या होत्या. त्यांचे मृतदेह हे त्यांच्या घराशेजारील असलेल्या विहिरीत सापडले आहेत. या घटनेमुळे कन्नड तालुक्यात खळबळ उडाली.
मिळालेल्या माहितीनुसार कन्नड तालुक्यातील चिकलठाणा या गावातील गेल्या तीन दिवसापासून दोन सख्या बहिणी या बेपत्ता होत्या. त्यांचा शोध चालू असतानाच या दोघीही मृत अवस्थेत घराजवळील विहिरीत दिसून आले. चिकलठाणा मधील दत्तू बाबुराव चव्हाण हे आपल्या शेतातच राहत असतात.
त्यांना स्वाती आणि शीतल या दोन मुली आहेत. या १४ जानेवारी पासून घरातून बेपत्ता झाल्या होत्या. त्याची तक्रार पोलिसात देखील केली होती.या बेपत्ता झालेल्या मुलींचा शोध घेण्यास चालू होते परंतु त्या सापडत नव्हत्या. परंतु काल शोध घेत असताना विहिरीत स्वाती चा मृतदेह विहिरीमध्ये तरंगताना दिसून आला.
नंतर शोध घेताना शोध पथकाला शितलचा ही मृत देह त्याच विहिरीत सापडला. या दोन सख्या बहिणींचे मृतदेह हे घराजवळील विहिरीत सापडल्यामुळे परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे. दोन मुलीचा एकदाच मृत्यू झाल्याने चव्हाण कुटुंबावर शोककळा पसरली आहे. या घटनेचा पोलीस यंत्रणा तपास करत आहे. घटनेचा पुढील तपास झाल्यावर पुढील माहिती देऊ असे पोलिसांनी सांगितले.