दुदैवी: दुष्ट पतीने आपल्या दोन वर्षीय चिमुकल्या मुलाची आणि पत्नीची केली हत्या, परीसरात हळहळला.

दुदैवी: दुष्ट पतीने आपल्या दोन वर्षीय चिमुकल्या मुलाची आणि पत्नीची केली हत्या, परीसरात हळहळला.
औरंगाबाद : गेला काही दिवसांपासून गुन्हेगारी मध्ये जास्तच वाढ झालेली दिसून येत आहे. रस्ते अपघात सोबतच आत्मत्या, खून, मारामाऱ्या यामध्ये सुद्धा प्रमाण जास्त झाले आहे. औरंगाबाद शहरात असाच एक विचित्र मन हेलावून टाकणारा प्रकार घडला आहे. या घटनेत दोन जणांची हत्या झाल्यामुळे औरंगाबाद शहरात भीतीची वातावरण निर्माण झाले आहे. चारित्र्याचा संशय घेऊन एका युवकाने आपल्या पत्नीला गळा दाबून मारले. एवढे करून थांबला नाही तर त्यांनी अडीच वर्षाच्या त्याच्या मुलाला देखील मारून टाकले. यामुळे शहरात खळबळ माजली आहे.
पोलिसांनी या घटनेची माहिती मिळताच तपासणी केली. यामध्ये घटनेची माहिती ही पोलिसांना स्वतः आरोपीने च दिली होती. समीर विष्णू मस्के हे आरोपी हत्या करणाऱ्या युवकाचे नाव आहे. तर बायकोचे नाव हे आरती विष्णू मस्के हे आहे. तसेच त्यांच्या मुलाचे नाव हे निशांत समीर मस्के आहे.
मिळालेल्या माहितीनुसार समीर हा आपल्या बायकोसोबत आणि दोन वर्षाच्या मुलासोबत कांचनवाडी या ठिकाणी राहत होता. परंतु समीर हा आपल्या बायकोवर कायम संशय घेत असे. त्यामुळे दोघांमध्ये नेहमी भांडण होत असत. परंतु काल रात्री पुन्हा एकदा समीर आणि आरती यांच्यात वाद झाले. त्यावेळी समीर ने आरती आणि निशांत ला दोरी ने गळ्याला अवळले. त्यात आरती आणि निशांत या दोघांचा मृत्यू झाला. औरंगाबाद मधील पोलिसांना समीर ने आपल्या बायकोची आणि मुलाची हत्या करताच ते त्या ठिकाणी पोहोचले. पोलिस पंचनामा करत होते.
आरती आणि निशांत चा मृतदेह पोस्टमर्टम करण्यासाठी औरंगाबाद येथे घेऊन गेले. तसेच आरोपी समीर मस्के याला अटक केली आहे. या प्रकरणात समीरच्या आईवर ही गुन्हा दाखल केला आहे. समीरला त्याच्या आईनेच हत्या करण्यास भाग पाडले असे आरोप हे समीरच्या सासू साऱ्यांनी केले आहेत.
आरती यांच्या माहेरच्या लोकांनी दिलेल्या तक्रारीवरून समीर ने आईच्या सांगण्यावरून आरती आणि निशांत याचा दोरीने खून केला. त्यामुळे पोलिसांनी समीर आणि त्याची आई सुनीता मस्के यांना अटक केली आहे. या दोघांवर हतेचा गुन्हा पोलिसांनी दाखल केला आहे. या घटनेची माहिती परिसरातील लोकामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. त्या बरोबर आरती आणि तिचा चिमुरडा यांच्या मृत्यूमुळे परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.