छोट्याशा चुकीमुळे अख्या कुटुंबाला गमवावा लागला आपला जीव, थंडीमुळे लावल होत घराचं दार..

Pune: राज्यात दुर्घटनेचे प्रमाण मोठ्या संख्येनं वाढल असलेलं दिसत आहे. गेल्या काही दिवसात थंडी ही मोठ्या प्रमाणात वाढलेली दिसून येत आहे. या थंडीपासून बचाव करण्यासाठी प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने प्रयत्न करत आहेत. या थंडीपासून वाचण्याच्या प्रयत्नात एक पुण्यातील कुटुंब उध्वस्त झाल्याची घटना समोर आली आहे.पुण्यामध्ये थंडीपासून सुटका मिळावी यासाठी एका कुटुंबाने रात्री गॅस हिटर लाऊन झोपले होते. हे गॅस हिटर त्या कुटुंबाच्या जीवावर बेतल आहे.
रुममधील गॅस हिटर हे पूर्ण रात्र चालू ठेवल्याने कुटुंबाचा जीव गुदमरून गेला. त्यातच संपूर्ण कुटुंबाला आपला जीव गमवावा लागला. असा अंदाज पोलिसांनी तपासणी करताना सांगितला आहे. पुण्यातील शिंदे कॉलनी मघील ही घटना घडली.
मिळालेल्या माहितीनुसार रविवारच्या दिवशी दूधवाला हा बराच वेळ एका घराच्या दरवाज्यासमोर उभा होता. खूप प्रयत्न करून घरातून कोणत्याही पद्धतीचा रिस्पॉन्स आला नाही. त्यावेळी त्याने या कुटुंबाबद्दल चौकशी केली.त्यावेळी शेजारी देखील या कुटुंबातील व्यक्तींना बोलावू लागले परंतु कोणीच आतधून प्रतिसाद दिला नाही . त्यामुळे येथे राहणाऱ्या लोकांना संशय आला आणि त्यांनी या बद्दल पोलिसांना सांगितले.त्यामुळे ही घटना उघडकीस आली.
संकेत जाधव हे तेथील कारखान्यात मॅनेजर म्हून काम करत होते. शनिवारच्या रात्री त्याची बायको आणि मुलगा झोपण्यासाठी गेले होते. त्या दिवशी खूपच थंडी पडलेली असल्याने त्यांनी झोपताना गॅस हिटर चालूच ठेवला होता. यावेळी घराचे दारे आणि खिडक्या पूर्ण बंद केल्या होत्या. गॅस हिटर चालू असल्यामुळे कुटुंबातील व्यक्तीचा जीव गुदमरला गेला. त्यातच रविवार सकाळ पर्यंत तिघेही मरण पावले असावेत असे पोलिसांनी सांगितले.
सकाळच्या वेळी दूध वाल्याला घरातून प्रतिसाद न मिळाल्याने शेजारील लोकाशी चौकशी केली. त्यावेळी इतरांना शंका आल्याने पोलिसांना बोलावण्यात आले होते. पोलिसांनी जाधव कुटुंबाच्या घरी आल्यावर त्यांच्या घराचे दार तोडून काढले. पोलिसांना घरात बेडरूम मध्ये तिघेही बेशुद्ध असलेले दिसले. जाधव कुटुंबाला त्वरित हॉस्पिटल मध्ये घेऊन जाण्यात आले. परंतु हॉस्पिटल मध्ये पोहोचण्यापूर्वीच त्या तिघांचाही मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या दुर्घटनेत छोट्याशा चुकीमुळे संपूर्ण कुटुंबाला आपला जीव गमवावा लागला.या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.