निःशब्द! फुगे आणायला गेलेल्या 2 वर्षाच्या चिमुरडीचा मृत्यू. शरीरापासून वेगळा झाला.

अमरावती : अमरावती जिल्यातील अचलपूर तालुक्यात एका झालेल्या गॅस च्या स्फोटामध्ये २ वर्षाच्या चिमुरडीचा पाय शरिराराच्या वेगळा होऊन मृत्यु झाल्याची घटना घडली आहे. शिंदी बुद्रुक या ठिकाणी पोळ्याची यात्रा चालू होती. या यात्रेमध्ये अनेक यात्रेकरू आलेले होते.
लहान मुले यांचाही सामावेश होता. लहान मुले यात्रेतील खेळणे घेण्यात दंग झाली होती. या ठिकाणी झालेल्या अपघातात २ वर्षाच्या २ वर्षाच्या मुलीचा पाय शरीराच्या वेगळा झाला आणि ती जागेवरच बेशुद्ध पडली. बेशुद्ध असतानाच त्यामुलीला दवाखान्यात घेऊन जाण्यात आले परंतु उपचार करण्यापूर्वीच ती मरण पावली. भार्गवी उर्फ परी सागर रोहि हे या मुलीचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार परी सागर रोही ही २ वर्षीची मुलगी आपल्या आजोबांबरोबर रवींद्र किसनराव रोही याच्यासोबत यात्रेला गेली होती. यात्रेच्या ठिकाणी हवेत उडणारे फुगे बघून ती आपल्या अजोबसोबत फुगे विकणाऱ्याच्या जवळ गेली. तेवढ्या फुगे विकणाऱ्याकडील असणाऱ्या गॅस सिलिंडरचा स्फोट झाला.
या स्फोटात चिमुरडीचा पाय शरीरापासून वेगळा झाला. आणि ती बेशुद्ध पडली . परी ला उपचारासाठी दवाखान्यात उपचार करण्यासाठी घेऊन गेले परंतु अर्ध्या रस्त्यातच परीने जीव सोडला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. रोही परिवार चिमुरडीचा मृत्यू ने दुःखात बुडाला आहे.