विशेष

निःशब्द! अंध आईवडिलांना आधार देणं ५ वर्षीय चिमुरडीच हातात नव्हतच. जवळच्या व्यक्तीने अपहरण करून खून केला.

नांदेड : गेल्या काही दिवसांपासून खून, मारामारी यांसारखे गुन्हे सतत घडत असल्याचे दिसून येत आहे. अशीच एक लाहन चिमुरडीचा खून झाल्याची हृदयद्रावक घटना नांदेड शहरात घडली. अपहरण करून तिचा खून केल्याची घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

 

नांदेड शहरातील तेहरानगर परिसरात जवळपास २५ ते ३० अंध घरे आहेत . आंकुष हटेकर हे सुधा येथेच राहतात. यांच्याच कुटुंबातील ५ वर्षाच्या चिमुरडीचा तिच्याच काकाने अपहरण करून खून केला आहे. या नराधमाने चिमुरडीला अंगणात खेळत असताना अपहरण केलं. सख्या भावाच्या मुलीचा खून करून प्रेत गोदावरी नदीत फेकून दिले.

 

चिमुरडीचा आईवडिलांनी चिमुरडी घरी आली नाहीं म्हणून पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली. त्यांचे म्हणणे पोलिसांनी एकूण घेतले नाही त्यामुळे त्यांनी पालक मंत्राशी संपर्क केला. त्यामुळे शिवाजी नगर मधील पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन चौकशी करून सोडून दिले.

 

परंतु तिसऱ्या दिवशी चिमुरडीचा मृतदेह नदीवर तरंगताना दिसला. यामुळे शिवाजीनगर पोलीस स्टेशनच्या पोलिसांवर पीडित कुटुंबांनी संताप व्यक्त केला. पोलिस अधिकाऱ्याला आणि आरोपीला शिक्षा केल्याशिवाय आम्ही मृत देह ताब्यात घेणार नाही असे सांगितले आहे. इवल्याशा चिमुरडीचा खून केल्याने परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटने मागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close