विशेष

निःशब्द! हसतखेळत कुटूंब झालं उध्वस्त, आधार कार्ड अपडेट करायला गेले अन् बापलेकी परतलेच नाही

Mute! Laughingly, the family was devastated, went to update the Aadhaar card and did not return to Bapleki

संभाजी नगर : सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सतीश शिंदे हे ३२ वर्षाचे युवक आपल्या ६ वर्षाच्या मुलीची पैठण येथे आधार कार्ड नोंदणी करण्यासाठी गेले होते. नोंदणी करून परत येत असताना त्यांना टेंपोने पाठीमागून धडक दिली. त्या धडकेमध्ये त्यांची मुलगी खूप उंच उडली गेली आणि तिथेच तिचा मृत्यू झाला. हे दृश्य तिच्या बापाने डोळ्याने पाहिले होते. त्यांनाही धडक जोरात बसली होती. अपघात इतका भीषण होता की त्यांच्या गाडीचा चुराडा झाला होता.

आधारकार्ड नोंदणी करण्यासाठी गेलेल्या बाप लेकीचा अपघातात मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
संभाजी नगर येथे मुलगी आणि वडील दोघेजण आधार नोंदणी करून येत असताना वाटेतच त्यांच्यावर काळाने झडप घातली . पाठीमागून येणाऱ्या आय शर टेंपोने धडक दिली आणि त्या धडकेत चिमुकली खूप उंचावर फेकली गेली.त्यातच तिचा मृत्यू झाल्याची घटना संभाजीनगर येथे घडली.

अपघात झालेल्या ठिकाणी पोलीस पोहोचले. सतीश शिंदे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. परंतु उपचार चालू असतानाच त्यांचाही मृत्यू झाला. एकसात एकच कुटुंबातील दोन व्यक्ती गेल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर पसरला आहे. परिसरातील नागरिक हळहळ व्यक्त करत होते.

या पैठण आणि पाचोड रोडवर वरती नेहमीच असे अपघात होत असतात.नागरिकांमधून प्रशासनाला रोडकडे लक्ष देऊन त्यात सुधारणा करण्याची मागणी वारंवार केली जातं आहे. तसेच या रोडलगत कॅमेरे ही बसवणे याची ही मागणी केली जात आहे. महत्वाचे म्हणजे रोड वरून नागरिकांची ये जा करत असतात.

वाहनाच्या वेगाची मर्यादा ठेवण्यात यावी याची ही मागणी केली जात आहे. चिमुकली आणि तिचा बाप यांचा मृत्यू झाल्याने नागरिकात शोककळा पसरली आहे. वाहनाच्या वेगावर पर्याय काढा यासाठी नागरिक संतप्त देखील झाले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close