ह्रदयद्रावक! 22 वर्षीय महिलेचा पोटातल्या बाळा सहित निधन ; उपचारासाठी निघाली अन्…

जुन्नर | जुन्नर तालुक्यातील नारायण येथे एक दुर्दैवी घटना घडली आहे. अपघातात उसाच्या ट्रॉलीखाली एक गरोदर महिला सापडली आणि तिच्या अंगावर ट्रॉली पलटली आणि तिचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली होती. यामुळे तालुक्यात खळबळ माजली आहे. विद्या रमेश कानसकर हे त्या महिलेचं नाव आहे . तिच वय 22 वर्षे आहे.
ट्रॅक्टरच्या दोन ट्रॉलीत ऊस होता. तो ट्रॅक्टर तो ऊस घेऊन चालला होता. अशावेळी त्या ट्रॉलीच्या मागच्या चाकात ती महिला सापडली आणि तिचा चिरडून मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेनं जन्माला येणाऱ्या बाळाला देखील आपले प्राण गमवावे लागले आहेत. या अपघातानंतर नागरिक देखील संतप्त झाल्याचं समजतंय. या घटनेचे साक्षीदार तिचे पती रमेश कानसकर आहेत. अशावेळी चालकाला ताब्यात घेण्यात आल आहे. गोरक्ष सुखदेव ढेबरे अस चालकाच नाव आहे.
अधिक माहिती अशी आहे की; नारायणगाव विद्या या उपचारासाठी आल्या होत्या. पुढं गतिरोधक आल्यानं त्या गाडीवरून उतरल्या. पुढून उसाचा ट्रॅक्टर आला आणि महिलेला धक्का लागला. अशावेळी ती ट्रॅक्टरची ट्रॉली त्या महिलेच्या अंगावर पडली. ती जागीच ठार झाली. त्यांना दवाखान्यात दाखल केलं गेलं. परंतु डॉक्टरांनी मृत असल्याचं घोषित केलं.