विशेष

धक्कादायक ! आईची नजर दोन मिनिटांसाठी हटली अन् क्यूट बाळाचा भयानक अंत झाला

Shocking! The mother lost her sight for two minutes and the cute baby met a horrible end

औरंगाबाद : औरंगाबाद शहरातील सोमपुरी गावात घडलेली ही घटना आहे. मुलावरील आईच लक्ष काही मिनिटांसाठी दूर होत आणि त्याच वेळी चिमुकल्या मुलाला आपला जीव गमवावा लागतो.

 

घरातील कामासाठी अनस ची आई गुंतली होती. घराबाहेरील आरडाओरड ऐकल्यानंतर ती बाहेर आली आपल्या चिमुकल्या मुलाला तारेला चिकटलेला पाहून आक्रोश करू लागली. आपल एकुलत एक लहानस बाळ या जगात नाही याचा विश्र्वासच बसत नव्हता. या लहानशा मृत्यूने त्याच्या आईवडिलांचे दुःख ची कल्पना कोणी करूच शकत नाही.

 

गावातील इतर नागरिक, नातेवाईक आईवडिलांना सावरत होते. समजाऊन सांगत होते.परंतु चिमुकल्याचा जीव गेल्याचे दुःख विसरता येत नव्हते.घरामध्येच खेळत असणारा चिमुरडा खेळता खेळता घरासमोरील अंगणात आला आणि अंगणात लोंबकळत असलेल्या विजेच्या तारेला स्पर्श होऊन प्राण गमवावे लागला. वीज वितरण कंपनीच्या हलगर्जीपणामुळे अनस या पाच वर्षाच्या चिमुकल्याला जीव गमवावा लागला.

 

याविषयी स्थानिक नागरिकांकडून मिळालेली माहिती अशी की अनस हा घरातून खेळत खेळत बाहेर आला.घरासमोरील विजेच्या तारेला त्याच्या स्पर्श झाला.विजेच्या धकक्याने तडफडून मृत्यू झाला.अनस ज्यावेळी तारेला चिकटला तेव्हा त्याची आई घरात काहीतरी काम करत होती.

 

गावकरी आरडाओरड करू लागले तेव्हा ती बाहेर आली आणि अन्सला विजेच्या तारे पासून दूर केले. व ताबडतोब हॉस्पिटल मध्ये घेऊन गेले. परंतु वाटेतच अन्सचा जीव गेला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरातील नागरिकांनी हळहळ व्यक्त केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close