भयानक वास्तव! या कारणामुळे तरुणीने संपवले जीवन, कारणं जाणुन धक्काच बसेल.

नागपूर: गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात वेगवेगळ्या कारणांमुळे आत्महत्यांची संख्या वाढत चालली आहे. काही ठिकाणी गेममध्ये देखील आत्महत्या झाल्याचे उघडकीला आले आहे. बीड मधील पब्जी गेम मुळे केलेली आत्महत्या ताजी असतानाच नवीन प्रकरण समोर आले आहे. नागपूर जिल्ह्यात एका विद्यार्थिनी ने आपली आर्थिक स्थिती कमजोर असल्याने आपले शिक्षण पूर्ण होणार नाही यामुळे आत्महत्या केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार संजना संजय सातपुते वय वर्षे २० ही विद्यार्थिनी आहे. संजना निराश होती. या निरशेमधून तिने टोकाचे पाऊल उचलले आहे. तिने आपल्या घरात फॅन ला गळफास लावून घेतल्याची धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. अमरावती जिल्ह्यात वरूड येथील महाविद्यालयात संजना ही शिकत होती.
तीला कॉम्प्युटरचे क्लास करायचे होते. कॉलेजला सुट्टी असताना ती कामाला सुध्धा जात होती. तिच्या घरची परिस्थिती बेताची असल्याने तिला कॉम्प्युटरचे क्लास लावता येत नव्हते. त्यामुळे ती निराश झाली होती. ती घरी सांगायची की मला नोकरी लागू द्या मग सर्व ठीक होईल. निराश झालेल्या संजनाने सगळी कागदपत्रं जाळली आणि नंतर मध्य रात्री तिने आपले जीवन संपवले.
कॉलेज मध्ये संजना ही हुशार होती. रोजच्या प्रमाणे संजना घरातील माणसासोबत जेवण केले. त्यानंतर तिने आपल्या छोट्या बहिणी सोबत झोपायला गेली. काही वेळाने रात्री तिच्या छोट्या बहिणीला जागं आली तेव्हा संजना ही छताला लटकलेली दिसून आली.
त्यामुळे लगेच तिने ओरडायला सुरुवात केली. तसेच आपल्या आई वडिलांना जागे केले. संजनाला खाली काढून तिच्या आई वडिलांनी लगेच हॉस्पिटल मध्ये घेऊन गेले. डॉक्टरांनी तिला अगोदरच मृत सांगितले. पोलिसांनी घटनेची मृत नोंद केली. या घटनेने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे. संजनाच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर पसरला आहे.