संपूर्ण संभाजीनगर हादरलं! वयवृद्ध आजी आजोबा सोबत घडला धक्कादायक प्रकार.
The entire Sambhajinagar shook! A shocking incident happened to an elderly grandparent.

संभाजीनगर : गेल्या काही दिवसांपासून संभाजीनगर शहरात सतत गुन्हेगारी वाढत असल्याने दिसून येत आहे. या वाढत्या गुन्हेगारी,खून, चोरी यामुळे नागरिकात भीतीचे वातावरण पसरले असून नागरिकांनी आता पोलिसांचा सहारा घेण्याचे ठरवले आहे.
अशातच एक नवीन घटना समोर आली. या औरंगाबाद शहरामध्ये एक वयोवृद्ध जोडप्याची गळा दाबून खून केल्याची घटना घडली असून नागरिकात भीतीचे वातावरण पसरले आहे. संभाजीनगर मधील पैठण तालुक्यात या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार पैठण तालुक्यातील फरोळा गावात हे प्रकरण घडल्याचे वृत्त आहे. याठिकाणी वृध्द जोडप्याचे गळा दाबून मारून टाकले आहे. चोरी करण्यासाठी घरात मध्यरात्री चोर घुसले होते.त्या चोरट्यांनी या वयोवृद्ध जोडप्याची हत्या केली असेल असे पोलिसांनी अंदाज लावला आहे.
ज्या ठिकाणी घटना घडली तेथे गुन्हे शाखेचे पथक आणि कुत्री पथक सुधा पोहोचले असून प्रकरणाची कसून चौकशी केली जात आहे. खून झालेल्या जोडप्याचे नाव भीमराव खरणाळ आणि शशिकला खरणाळ आहे. या घटनेमुळे फारोळा गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.