विशेष

Today horoscope: आजचे राशभविष्य- ७ डिसेंबर २०२२ वार बुधवार

Today horoscope in Marathi 07 December 2022

Today horoscope: मिञांनो आजचे राशि भविष्य हे ज्योतिष शास्त्रानुसार वर्तवले जात असते. ग्रहांच्या हालचालीं नुसार अनुमान काढले जाते. (Today horoscope)

 

मेष

तुमच्या आशेचा किरण उंचावेल. व्यवसायिक दृष्ट्या दिवस चांगला आहे. आज नातेवाइकांकडून भेटवस्तू मिळतील. प्रवास घडून येईल. दूर गेलेले लोक परत तुमच्याकडे येताना दिसतील. घर कामात त्रास जाणवेल. शांतता मिळवण्यासाठी एकांतात बसुन रहा.

 

वृषभ

आज तुम्हाला नवीन मित्राची ओळख होईल. अचानक धनलाभ होईल. प्रिय व्यक्ती नसल्याने उदास वाटेल. व्यवसायाच्या दृष्टीने प्रवास होण्याची शक्यता आहे. जोडीदारामुळे नियोजन बदलू नका.

 

मिथुन

 

आज थकल्यासारखे जाणवेल त्यामुळे तुम्हाला आरामाची गरज आहे. पैसा मिळवण्यासाठी नवीन कल्पना वापराल.

या राशीतील मुले आज खेळण्यात दिवस घळवतील. आज तुमच्यासाठी रोमँटिक दिवस असेल.

 

कर्क

कर्क राशीच्या लोकांनी आहारावर आज नियंत्रण ठेवा. आरोग्य समस्या असल्याने पैसा खर्च होण्याची शक्यता आहे. जोडीदरासोबत दिवस जाईल . सुट्टीची योजना करून ट्रीप काढण्याचा विचार केला जाऊ शकतो.

 

सिंह

आरोग्य चांगले राहील.परंतु आपण करत असलेल्या प्रवासात समस्या उद्भवण्याची शक्यता नाकारता येणार नाही. अचानक कोणत्यातरी धनलाभ होईल.राजकारणात लक्ष घालू नका. तुमचं दिवस त्यामुळे वाया जातील. घरात लक्ष द्या.

 

कन्या

आजचा दिवस शांत असेल. तुमच्या मनातील विचार इतरांना शेअर करा. आपल्या व्यवसायात पैसा खर्च होण्याची शक्यता आहे. आज कला गुणांना वाव मिळेल.

जवळच्या व्यक्तीची भेट होईल. तुमचे नातेवाईक तुमच्या सोबत असतील.

 

तूळ

तुमचे मन मोठे आहे त्यामुळे इतर व्यक्ती तुमच्याकडे आकर्षित होतील मोठ्या योजना अमलात येतील. रोमांचक प्लॅन मुळे दिवस आनंदात जाईल. वेळेच्या अगोदर सर्व कामे पूर्ण करा.त्याचे फायदे तुम्हालाच होतील.आजचे काम उद्यावर ढकलू नका. जोडीदार खुश होतील.

 

वृश्चिक

तुमचे आवडते स्वप्न पूर्ण होईल. आजचा दिवस तुमच्यासाठी खास असेल. आज अचानक कोणीतरी पाहुणा येऊ शकतो. कामाच्या ठिकाणी जास्त लोड घेऊ नका . जोडीदाराचे सहकार्य लाभेल. आजचा दिवस शुभ आहे.

 

 

धनु

आज कोणतीही गडबड करू नका. जेवढे तुम्ही शांत असाल तेवढे तुमच्यासाठी फायद्याचे असेल. तुम्ही जे करत नाहीत त्या गोष्टी इतरांना सांगू नका.फुकटचे सल्ले कोणाला देऊ नका. तुमचे आयुष्य आज खूप सुंदर असणार आहे.

 

मकर

आज तुमच्या खुशीचा दिवस असेल. लग्न झालेल्या सासर कडून धनलाभ होईल. इतरांना पटवून देण्यात तुम्ही पटाईत असल्याने आज त्याचा तुम्हाला फायदा होईल. घरात नवीन पाहुणा आल्याने तुमचे नियोजन विस्कळीत होईल.परंतु आजचा दिवस आनंदात जाईल.

 

कुंभ

आजारातून बरे व्ह्याल परंतु तरीही आरोग्याची काळजी घ्या. आज तुमची मुले एखादे चांगले काम करतील.अनुभवी लोकांचा सल्ला घ्या. व्यवसायात फायदा होईल. दोघात तिसरा येऊ देऊ नका.

 

मीन

कामाच्या त्रासाने उदास वाटेल.तुमच्याकडे धन नाही परंतु आज कोणाकडून तरी धन येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मोठ्या व्यक्तींचा सल्ला घ्या. कुणीतरी खास अशी व्यक्ती तुमचे लक्ष वेधून घेण्याची शक्यता आहे. आपल्या कामावर लक्ष केंद्रित ठेवा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close