विशेष

दुर्दैवी! बहिणीकडे गेला,भाऊबीज झाली; त्यांनतर जे घडलं ते थरकाप उडवणारी होत

Jalgaon News Today: पाचोरा शहरातील श्रीराम नगर येथील रहिवाशी असलेला राहुल सुरेश चौधरी हा युवक दि. २७ ऑक्टोबर रोजी भाऊबीजेसाठी आपल्या बहिणीकडे गेला. त्याने आपल्या बहिणीचे आशिर्वाद घेत मोठ्या उत्साहात भाऊबीज हा सण साजरा केला पण त्यानंतरच काय घडलं की हा त्याचा ठोका चुकून जाईल.
दरम्यान दि. २७ ऑक्टोबर २०२२ रोजी दुपारी १२:३० वाजे सुमारास राहुल हा वालझिरी (चाळीसगाव) येथे नवसाच्या कार्यक्रमात सहभागी झाला होता. यावेळी याठिकाणी नदीपात्राजवळ हात पाय धुण्यासाठी गेला असता अचानक राहुल याचा पाय घसरून तो थेट खोल पाण्यात पडला.

 

सदरचा प्रकार त्याचे सोबत असलेल्या चिमुकल्यांनी परिवारातील सदस्यांना सांगितला असता तात्काळ उपस्थितांच्या मदतीने राहुल यास पाण्यातुन बाहेर काढण्यात आले. व लागलीच चाळीसगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्यानंतरच वैद्यकीय अधिकारी यांनी राहुल यास मयात घोषित केले.

 

भाऊबीज साजरी करण्यासाठी आपल्या लाडक्या बहिणीचे आशिर्वाद घेण्यासाठी गेलेल्या पाचोरा येथील १७ वर्षीय युवकाचा वालझिरी ( ता. चाळीसगाव) येथील नदीपात्रात पाय घसरून पडल्याने पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना दि. २७ ऑक्टोबर रोजी घडली आहे. राहुल सुरेश चौधरी सतरा वर्षाचा होता.असे माहिती मयत तरुणाचे आहे.

 

घटनेनंतर कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. मयत राहुल चौधरी याचे पश्चात्य वृद्ध आई, बहिण, बहिण असा परिवार असुन राहुल चौधरी याच्या घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची आहे. त्याच्या आत्म्याला शांती देवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close